कोल्हापूर : तलवारीने दहशत करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:14 PM2018-08-28T17:14:09+5:302018-08-28T17:17:36+5:30

गांधी मैदान परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री अटक केली. स्वप्निल संजय चौगले (वय २८, रा. फिरंगाई तालीमजवळ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन तलवारी जप्त केल्या.

Kolhapur: The youth of Shivaji Peth, a terrorist who was attacked by the sword, was arrested | कोल्हापूर : तलवारीने दहशत करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास अटक

संशयित स्वप्निल चौगलेकडून पोलिसांनी जप्त केलेल्या तलवारी. (छाया : नसीर अत्तार)

ठळक मुद्देतलवारीने दहशत करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास अटकगांधी मैदान परिसरात तीन तलवारी जप्त

कोल्हापूर : गांधी मैदान परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री अटक केली. स्वप्निल संजय चौगले (वय २८, रा. फिरंगाई तालीमजवळ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन तलवारी जप्त केल्या.


स्वप्निल चौगले (आरोपी)

पोलिसांनी सांगितले की, गांधी मैदान परिसरात एकजण सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत आरडाओरड करीत होता. हा प्रकार पोलिसांना समजताच गस्त घालणाऱ्या तरुणाला पकडण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेले.

पोलीस आल्याचे पाहून स्वप्निल चौगले पळू लागला. त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्याला पकडले. त्याने स्वप्निल चौगले असे आपले नाव असल्याचे सांगितले. त्याच्याकडून तीन तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मानसिंह खोेचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रीतम मिठारी, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, नितीन कुराडे, शाहू तळेकर, आदींनी केली.


 

 

Web Title: Kolhapur: The youth of Shivaji Peth, a terrorist who was attacked by the sword, was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.