शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोल्हापूर : योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:08 PM

प्रख्यात स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक आणि योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केरळ येथील अलपेटा येथील त्यांची कन्या कविता श्रेयांस यांच्याकडे राहण्यासाठी ते गेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.

ठळक मुद्देहदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन केरळ येथील अलपेटा येथे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना हदयविकाराचा धक्का

कोल्हापूर : प्रख्यात स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक आणि योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केरळ येथील अलपेटा येथील त्यांची कन्या कविता श्रेयांस यांच्याकडे राहण्यासाठी ते गेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. सायंकाळी सहा वाजता हवाई रुग्णवाहिकेने त्यांचे पार्थिव कोल्हापूरात आणण्यात येणार आहे.डॉ. गुंडे यांचे मूळ गाव कर्नाटकातील बोरगाव (ता. चिकोडी) हे आहे. व्यवसायासाठी ते कोल्हापूरात स्थायिक झाले. दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल या युवक शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

डॉ. गुंडे हे नामांकित अस्थिरोगतज्ज्ञ असले तरी त्यांची खरी ओळख योगगुरु अशीच होती. त्यांनी प्रदीर्घ काळ योगाचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य योग आणि प्राणायाम याच्याशी निगडित होते. त्यांची प्रेरणा घेउन अनेकांनी योगाचे धडे त्यांच्या शिबिरातून घेतले. आतापर्र्यत त्यांचे ९00 हून अधिक योगशिबिरे झाली असून ९0१ वे शिबिर पुढील महिन्यात कोल्हापूर मुक्कामी होणार होते.योगाच्या प्रसारासाठी तसेच प्रशिक्षणासाठी त्यांनी देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातही शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. योगक्षेत्रातील अपूर्व योगदानाबद्दल त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेने कोल्हापूर भूषण हा पुरस्कार देउन गौरविले होते.१९६६ पासून ते अस्थिरोगविषयक सल्लागार म्हणून कार्यरत होते. अस्थिरोगविषयक शस्त्रक्रिया आणि काही प्रमुख संस्थांमधील स्टेम सेल प्रत्यारोपणाचे त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. डॉ. गुंडे यांचे शाहुपुरीत कृष्णा नर्सिंग होम हे रुग्णालयत आहे. देशातील सर्वात मान्यताप्राप्त स्टेम सेल थेरपी डॉक्टर्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे अनेकांनी गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया देखील केली आहे.औषधोपचार शिस्तीतील सर्वात प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त प्रॅक्टीशनर्सपैकी एक असा त्यांचा नावलौकिक होता. अफाट विश्वसनीयता आणि वैद्यकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांनी मिळविला होता. मुलांमधे तसेच प्रौढांमधील पाठीचा कणा आणि अस्थी विकृती सुधारण्याशी संबंधित मस्कुलोस्केलेटल या प्रणालीशी संबंधित समस्यांशी ते संबंधित आहेत. अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय केंद्रामधून त्यांनी विशेष प्रशिक्षण प्राप्त केले होते. 

टॅग्स :Meditationसाधनाkolhapurकोल्हापूर