कोल्हापूर :  युवराज पाटील यांच्याबाबतची बुधवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 16:25 IST2018-05-05T16:25:50+5:302018-05-05T16:25:50+5:30

शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी बुधवारी (दि. ९) होणार आहे. जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्या अनुपस्थितीत हातकणंगलेचे सहायक निबंधक मनोहर माळी यांनी शनिवारी सुनावणीची प्रक्रिया पुर्ण केली.

Kolhapur: A Wednesday hearing on Yuvraj Patil | कोल्हापूर :  युवराज पाटील यांच्याबाबतची बुधवारी सुनावणी

कोल्हापूर :  युवराज पाटील यांच्याबाबतची बुधवारी सुनावणी

ठळक मुद्देयुवराज पाटील यांच्याबाबतची बुधवारी सुनावणीयुवराज पाटील यांना अपात्रतेची नोटीस

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी बुधवारी (दि. ९) होणार आहे. जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्या अनुपस्थितीत हातकणंगलेचे सहायक निबंधक मनोहर माळी यांनी शनिवारी सुनावणीची प्रक्रिया पुर्ण केली.

भूविकास बॅँकेच्या थकबाकीपोटी युवराज पाटील यांना अपात्रतेची नोटीस जिल्हा उपनिबंधकांनी काढली आहे. या नोटीसी नुसार जिल्हा उपनिबंधक काकडे यांच्या समोर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे.

शनिवारी मनोहर माळी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. पाटील यांच्या वतीने अद्याप वकील पत्र सादर केलेले नाही, हा मुद्दा तक्रारदार सुरेश देसाई यांनी निदर्शनास आणून दिला. वकील पत्र देणार नसतील तर एकतर्फी निकाल देण्याची मागणी देसाई यांनी केली. याबाबत बुधवारी सुनावणी ठेवली आहे.
 

Web Title: Kolhapur: A Wednesday hearing on Yuvraj Patil