शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बालिंगा, शिंगणापूर,नागदेवाडी उपसाकेंद्रात पाणी; कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 20:15 IST

Kolhapur Flood News: मुसळधार पाऊस व राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी शिंगणापूर,बालिंगा,नागदेवाडी उपसाकेंद्रात विद्युत पंपा पर्यंत पाणी पोहोचल्याने ही दोन्ही उपसा केंद्रे बंद करण्याचा निर्णय झाला असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले

-प्रकाश पाटील कोपार्डे -  मुसळधार पाऊस व राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी शिंगणापूर,बालिंगा,नागदेवाडी उपसाकेंद्रात विद्युत पंपा पर्यंत पाणी पोहोचल्याने ही दोन्ही उपसा केंद्रे बंद करण्याचा निर्णय झाला असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने बुधवारपासून काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनचा पाणी पुरवठा करणाऱ्या जँकवेलचा वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहक तारांवर आटेगाव (ता.कागल) येथे झाड पडल्याने बिघाड झाला आहे. यामुळे क।बावडा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी शिंगणापूर उपसाकेंद्रातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.शिंगणापूरातील उपसाकेंद्रा जवळ पंचगंगेच्या पाण्याची पातळी ५४५.३० मिटर झाली आहे.विद्युत पंपापासून केवळ सहा इंच पाणी कमी आहे.

पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने रात्री विद्युत पंप पाण्याखाली जाणार आहेत.यामुळे शिंगणापूरमधून पाणीउपसा बंद करावा लागणार आहे.तर बालिंगा,नागदेवाडी उपसाकेंद्रात भोगावतीचे पाणी आले आहे.यामुळे रात्री दहा नंतर हे तिन्ही उपसाकेंद्रातील विद्युतपंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहराच्या पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.काळम्मावाडीच्या थेटपाईपलाईनच्या उपसाकेंद्रातील वीजपुरवठ्यातील बिघाड आज शनिवारी  निघणार आहे असे सांगण्यात आले. यावरच शहराच्या पाणी पुरवठ्याची भिस्त अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूर