Kolhapur: बालिंगा, शिंगणापूर,नागदेवाडी उपसाकेंद्रात पाणी; कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 20:15 IST2024-07-26T20:14:39+5:302024-07-26T20:15:07+5:30
Kolhapur Flood News: मुसळधार पाऊस व राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी शिंगणापूर,बालिंगा,नागदेवाडी उपसाकेंद्रात विद्युत पंपा पर्यंत पाणी पोहोचल्याने ही दोन्ही उपसा केंद्रे बंद करण्याचा निर्णय झाला असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले

Kolhapur: बालिंगा, शिंगणापूर,नागदेवाडी उपसाकेंद्रात पाणी; कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार
-प्रकाश पाटील
कोपार्डे - मुसळधार पाऊस व राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी शिंगणापूर,बालिंगा,नागदेवाडी उपसाकेंद्रात विद्युत पंपा पर्यंत पाणी पोहोचल्याने ही दोन्ही उपसा केंद्रे बंद करण्याचा निर्णय झाला असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने बुधवारपासून काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनचा पाणी पुरवठा करणाऱ्या जँकवेलचा वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहक तारांवर आटेगाव (ता.कागल) येथे झाड पडल्याने बिघाड झाला आहे. यामुळे क।बावडा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी शिंगणापूर उपसाकेंद्रातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.शिंगणापूरातील उपसाकेंद्रा जवळ पंचगंगेच्या पाण्याची पातळी ५४५.३० मिटर झाली आहे.विद्युत पंपापासून केवळ सहा इंच पाणी कमी आहे.
पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने रात्री विद्युत पंप पाण्याखाली जाणार आहेत.यामुळे शिंगणापूरमधून पाणीउपसा बंद करावा लागणार आहे.तर बालिंगा,नागदेवाडी उपसाकेंद्रात भोगावतीचे पाणी आले आहे.यामुळे रात्री दहा नंतर हे तिन्ही उपसाकेंद्रातील विद्युतपंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहराच्या पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.काळम्मावाडीच्या थेटपाईपलाईनच्या उपसाकेंद्रातील वीजपुरवठ्यातील बिघाड आज शनिवारी निघणार आहे असे सांगण्यात आले. यावरच शहराच्या पाणी पुरवठ्याची भिस्त अवलंबून राहणार आहे.