कोल्हापूर : शनिवार पेठेत घराची भिंत पडली, सुदैवाने जीवित हानी नाही : ६० ते ७० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:52 IST2018-08-20T15:39:55+5:302018-08-20T15:52:18+5:30
पाऊसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शनिवार पेठ सोन्या मारुती चौक परिसरात घराची भिंत सोमवारी सकाळी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली. पण ; घराचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी भिंत उतरुन घेतली.

कोल्हापूर : शनिवार पेठेत घराची भिंत पडली, सुदैवाने जीवित हानी नाही : ६० ते ७० हजारांचे नुकसान
कोल्हापूर : पाऊसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शनिवार पेठ सोन्या मारुती चौक परिसरात घराची भिंत सोमवारी सकाळी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली. पण ; घराचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी भिंत उतरुन घेतली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, किशोर कोरडमल ओसवाल व दिलीप कोरडमल तेजपाल (रा. २५४९ सी वॉर्ड, शनिवार पेठ, कोल्हापूर) यांचे घर आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या घराच्या भिंतीचा भाग कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणी सापडले नाही.
नागरिकांना हा प्रकार अग्निशमन दलाला कळविला. त्यानूसार स्टेशनप्रमुख तानाजी कवाळे,जवान अनु शिंगारे, जयवंत डकरे, उदय शिंदे, दत्ता जाधव व पवडी विभागाचे उमेश माने घटनास्थळी आले. त्यांनी भिंत उतरुन घेतली. यामध्ये घराचे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.