कोल्हापूर : भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून वाशी येथे एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:49 IST2018-03-13T18:49:34+5:302018-03-13T18:49:34+5:30

वाशी (ता. करवीर) येथे भावकीतील भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. अण्णासो आप्पाजी पुजारी (वय ४७) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित महादेव मंगेश पुजारी (२८), अशोक मंगेश पुजारी (२९) यांना अटक केली. ही घटना रविवारी (दि. ११) घडली.

Kolhapur: The violence in the Bhandari program was one of the biggest casualties in Vashi | कोल्हापूर : भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून वाशी येथे एकास मारहाण

कोल्हापूर : भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून वाशी येथे एकास मारहाण

ठळक मुद्देवाशी येथे धार्मिक कार्यक्रमात एकास बेदम मारहाणदोघांना अटक, भांडी धुण्याचा वाद

कोल्हापूर : वाशी (ता. करवीर) येथे भावकीतील भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. अण्णासो आप्पाजी पुजारी (वय ४७) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित महादेव मंगेश पुजारी (२८), अशोक मंगेश पुजारी (२९) यांना अटक केली. ही घटना रविवारी (दि. ११) घडली.

अधिक माहिती अशी, वाशी येथील बिरदेव मंदिरासमोरील रिकाम्या जागेत रविवारी पुजारी भावकीतील भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची भांडी भावकीतील लोकांनी धुण्याची परंपरा आहे.

नानासो आप्पाजी पुजारी यांचा भाऊ अण्णासो पुजारी हे भांडी घासण्यास जात असताना संशयितांनी विरोध केला. त्यांना शिवीगाळ केल्याने दोघांनी मिळून बेदम मारहाण करीत बेशुद्ध केले.

याप्रकरणी नानासो पुजारी यांनी फिर्याद दिल्याने करवीर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक छाया मंडले करीत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: The violence in the Bhandari program was one of the biggest casualties in Vashi