कोल्हापूर : खड्ड्यामुळे महिलेचा बळी, महावीर कॉलेजसमोरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:26 IST2018-08-18T12:13:56+5:302018-08-18T12:26:26+5:30
कोल्हापूर-कसबा बावडा रस्त्यावर महावीर कॉलेजसमोर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुक्साना मन्सूर देसाई (वय ४०, शनिवार पेठ) असे तिचे नाव आहे.

कोल्हापूर : खड्ड्यामुळे महिलेचा बळी, महावीर कॉलेजसमोरील घटना
कोल्हापूर : कोल्हापूर-कसबा बावडा रस्त्यावर महावीर कॉलेजसमोर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुक्साना मन्सूर देसाई (वय ४०, शनिवार पेठ) असे तिचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, मन्सूर देसाई हे पत्नी रुक्साना यांना सोबत घेऊन सकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून कसबा बावडा येथील नातेवाइकाकडे जात होते. पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.
महावीर कॉलेजसमोरील रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पाठीमागे बसलेल्या रुक्साना तोल जाऊन खाली पडल्या. यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.
तीन दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. शुक्रवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हे वृत्त समजताच नातेवाइकांनी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.