इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी राजकीय वाती पेटल्या आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, याचे धागेदोरे स्थानिक पातळीवरून व्हाया कोल्हापूरमुंबईतील मंत्रालयापर्यंत जोडले गेले आहेत. कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असतानाच, मुंबईतून येणाऱ्या मदतीवर आणि मार्गदर्शनावर अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.‘पॉवर सेंटर’ कोल्हापूर की मुंबई?इचलकरंजीच्या राजकारणात यंदा महानगरपालिका झाल्याने भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना अशा मोठ्या फौजा मैदानात आहेत. मुंबईतील पक्षश्रेष्ठींनी या निवडणुकीला ‘मिनी विधानसभा’ मानले असून, इथला निकाल आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरणार आहे.
कळीचे मुद्दे आणि राजकीय पेचपाणी प्रश्न : इचलकरंजीकरांसाठी ‘शुद्ध आणि दररोज पाणी’ हा सर्वांत मोठा निवडणुकीचा मुद्दा आहे. नळ योजना आणि त्यावरून होणारे राजकारण यावर मतदारांचा कल ठरणार का ?निधीचा पाऊस : सत्ताधारी महायुतीने मुंबईतून मोठा विकास निधी खेचून आणण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर विरोधकांच्या आरोपाकडे लक्ष लागले आहे.बंडखोरीचे ग्रहण : तिकीट वाटपावरून दोन्ही बाजूंना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी मित्रपक्षच समोरासमोर ठाकल्याने मुंबईतील नेत्यांना हस्तक्षेप करावा लागत आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणालामहायुती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: इचलकरंजीत ‘विजयी संकल्प रॅली’ काढून निवडणुकीचे गांभीर्य स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.शिव-शाहू आघाडी : शिव-शाहूची जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी स्थानिक पातळीवर तगडे आव्हान उभे केले आहे.थोडक्यात सांगायचे तर : इचलकरंजीची ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यासाठी नसून, कोल्हापूर जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व राहणार आणि मुंबईतील सत्तेचा रिमोट कंट्रोल कोणाकडे चालणार, याची ही लिटमस टेस्ट आहे.
वाचा: 'महामानवांविषयी वाट्टेल ती विधाने करून गैरसमज पसरवायचे हा भाजपचा नियोजनबद्ध अजेंडा'
नेत्यांचे कोल्हापुरातून लक्षनिवडणूक इचलकरंजी महानगरपालिकेची असली तरी मुंबई येथील सर्वच पक्षांचे प्रमुख व्हाया कोल्हापूर इकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, धैर्यशील माने, सतेज पाटील यांनी कोल्हापुरातून बारकाईने संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवले आहे.
Web Summary : The Ichalkaranji Municipal election is a battleground for political heavyweights. Key issues include water supply and development funds. The election's outcome will test the influence of Kolhapur and Mumbai leaders on local power dynamics, impacting future political equations.
Web Summary : इचलकरंजी नगर निगम चुनाव राजनीतिक दिग्गजों के लिए एक युद्ध का मैदान है। पानी की आपूर्ति और विकास निधि जैसे प्रमुख मुद्दे हैं। चुनाव का परिणाम स्थानीय शक्ति गतिशीलता पर कोल्हापुर और मुंबई के नेताओं के प्रभाव का परीक्षण करेगा, जो भविष्य के राजनीतिक समीकरणों को प्रभावित करेगा।