कोल्हापूर : वाकरे फाट्याजवळ कळंबेतील दुचाकीस्वारास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:37 IST2018-11-01T18:36:08+5:302018-11-01T18:37:49+5:30

वाकरे (ता. करवीर) फाटा येथे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी दुचाकीस्वाराचा मोबाईल व पैसे असे एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना २५ आॅक्टोबरला घडली. याबाबतची फिर्याद श्रीकांत महादेव पाटील (वय ३८, रा. कळंबे तर्फ कळे, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत बुधवारी (दि. ३१) रात्री दिली.

Kolhapur: A two-wheeler in Kalambar was robbed near the gate of the gate | कोल्हापूर : वाकरे फाट्याजवळ कळंबेतील दुचाकीस्वारास लुटले

कोल्हापूर : वाकरे फाट्याजवळ कळंबेतील दुचाकीस्वारास लुटले

ठळक मुद्देवाकरे फाट्याजवळ कळंबेतील दुचाकीस्वारास लुटले हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद

कोल्हापूर : वाकरे (ता. करवीर) फाटा येथे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी दुचाकीस्वाराचा मोबाईल व पैसे असे एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना २५ आॅक्टोबरला घडली. याबाबतची फिर्याद श्रीकांत महादेव पाटील (वय ३८, रा. कळंबे तर्फ कळे, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत बुधवारी (दि. ३१) रात्री दिली.

पोलिसांनी सांगितले की, उचगाव (ता. करवीर) येथे श्रीकांत पाटील हे एका औद्योगिक कंपनीत कामास आहेत. २५ आॅक्टोबरला त्यांची दुपारी चार ते रात्री १२ अशी शिफ्ट होती. शिफ्ट झाल्यावर ते दुचाकीवरून कोल्हापूर-गगनबावडामार्गे घरी जात होते.

याचवेळी दुचाकीवरून तिघे तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी दुचाकी आडवी मारून श्रीकांत पाटील याला अडविले. त्यांना दमदाटी करून त्यांच्या खिशातील मोबाईल व पैशाचे पाकीट बळजबरीने घेऊन ते पसार झाले. मोबाईल व चार हजार रुपये, पॅनकार्ड, वाहन परवाना, एटीएम, असा सुमारे ११ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 

 

Web Title: Kolhapur: A two-wheeler in Kalambar was robbed near the gate of the gate