कोल्हापूर :  बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे गंठण लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:52 IST2018-10-16T16:51:13+5:302018-10-16T16:52:01+5:30

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वेस्टेशन रोडवर पाचगावकडे जाणाऱ्या केएमटी बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे पर्समधील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्याने हातोहात लंपास केले. ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ​​​​​​​

Kolhapur: Traveling through buses, laths of the women's traveler | कोल्हापूर :  बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे गंठण लंपास

कोल्हापूर :  बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे गंठण लंपास

ठळक मुद्दे बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे गंठण लंपासशाहूपुरी पोलिसांत फिर्याद

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वेस्टेशन रोडवर पाचगावकडे जाणाऱ्या केएमटी बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे पर्समधील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्याने हातोहात लंपास केले. ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी, योगिता राहुल पाटील (वय ३६, रा. साजनी, ता. हातकणंगले) या सोमवारी माहेरी गिरगाव येथे जाण्यासाठी एसटी बसने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आल्या. तेथून पाचगाव केएमटी बसमध्ये त्या चढल्या. यावेळी प्रवाशांची गर्दी खूप होती.

रेल्वेस्टेशन दरम्यान आल्यानंतर तिकीटासाठी पर्समधून पैसे काढत असताना पर्समध्ये सोन्याचे गंठण नसल्याचे दिसले. त्यांनी बसमध्ये शोधाशोध केली असता, ते मिळून आले नाही. याप्रकरणी त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

 

Web Title: Kolhapur: Traveling through buses, laths of the women's traveler