शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोल्हापूर :घरात लपविलेला साडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 4:44 PM

कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शनिवार पेठ येथून घरात लपवलेला साडेतीन लाख किमतीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सोमवारी (दि. १२) रात्री जप्त केला. याप्रकरणी संशयित प्रसाद अरुण भोसले (वय ४५, रा. सी वॉर्ड, शनिवार पेठ) याला अटक केली.

ठळक मुद्देघरात लपविलेला साडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्तशनिवारपेठेत कारवाई : आरोपी अटक

कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शनिवार पेठ येथून घरात लपवलेला साडेतीन लाख किमतीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सोमवारी (दि. १२) रात्री जप्त केला. याप्रकरणी संशयित प्रसाद अरुण भोसले (वय ४५, रा. सी वॉर्ड, शनिवार पेठ) याला अटक केली.अधिक माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी आॅटो रिक्षामधून होणारी मद्याची वाहतूक पकडली होती. यावेळी मद्याचे सात बॉक्स जप्त केले होते. हा मद्यसाठा शनिवार पेठ येथील प्रसाद भोसले याच्या घरातून आणल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास भोसलेच्या घरी छापा टाकला असता, घरातील एका कुलूपबंद खोलीमध्ये साडेतीन लाख किमतीचे विदेशी मद्याचे ३९ बॉक्स मिळून आले. संशयित भोसले हा शहरात फोनवरील आॅर्डरीप्रमाणे स्वत: मद्याचा पुरवठा करीत होता. त्याला या व्यवसायामध्ये आणखी कोणी मदत करीत होते काय, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.नागरिकांनी माहिती द्यावीजिल्ह्याच्या विविध भागांत विदेशी मद्यसाठा, विक्री व वाहतुकीबाबतच्या कारवाया सुरू आहेत. अशा प्रकारे अवैध मद्यसाठ्याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस