कोल्हापूर :लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास बेदम चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 20:17 IST2018-11-02T20:15:55+5:302018-11-02T20:17:23+5:30

बोळावी येथील प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गातील चार मुलींचे लैंगिक शोषण करणाºया वर्गशिक्षकास शुक्रवारी संतप्त पालकांनी बेदम चोप दिला.

Kolhapur: A teacher who is sexually assaulted | कोल्हापूर :लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास बेदम चोप

कोल्हापूर :लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास बेदम चोप

सेनापती कापशी (जि. कोल्हापूर) : बोळावी येथील प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गातील चार मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या वर्गशिक्षकास शुक्रवारी संतप्त पालकांनी बेदम चोप दिला. सुनील भाऊ कांबळे (वय ४२, रा. बिद्री) असे त्याचे नाव असून मुरगूड पोलिसांनी शिक्षकास अटक केली आहे.

शिक्षक सुनील कांबळे याने पाचवीच्या वर्गातील चार मुलींचे लैंगिक शोषण करून त्याची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. दोन-तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. संबंधित मुलींना सहन न झाल्याने या मुलींनी मुख्याध्यापक मोहन पाटील यांना माहिती दिली होती पण मुख्याध्यापकांनी प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने पालकांचा उद्रेक झाला. पीडित मुलींनी आपल्या पालकांना या घटना सांगितल्यानंतर पालकांनी एकत्रितपणे शाळेत येऊन शिक्षकास जाब विचारला.

यावेळी संबंधित शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन पालकांना दम दिला. त्यामुळे संतप्त पालकांचाही संयम सुटला व जमावाने शिक्षकास बेदम चोप देत वर्गात कोंडून ठेवले. आणि घटनेची पोलिसांना माहिती दिली. शिक्षकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kolhapur: A teacher who is sexually assaulted