कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला; तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 10:53 IST2018-12-11T10:53:23+5:302018-12-11T10:53:58+5:30

कोल्हापूर : जुना वाशी नाका येथे पूर्ववैमनस्यातून चौघांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. धीरज सूरज सूर्यवंशी (वय ...

Kolhapur: Swords attacked by pre-eminence; Young injured | कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला; तरुण जखमी

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला; तरुण जखमी

ठळक मुद्दे पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला; तरुण जखमीजुना वाशी नाका येथील घटना : वाहनांची तोडफोड : चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : जुना वाशी नाका येथे पूर्ववैमनस्यातून चौघांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. धीरज सूरज सूर्यवंशी (वय २०) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित स्वप्निल पाथरवट, ओंकार, मुनीर रिक्षावाला, कार्लोस, अभी रिक्षावाला (सर्व रा. गंजीमाळ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

अधिक माहिती अशी, अमित पाटील आणि स्वप्निल पाथरवट यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. धीरज सूर्यवंशी हा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपले राहते घराचे समोर फिरत असताना संशयित तलवार, काठ्या घेऊन आले. त्यांनी धीरजला अमित पाटील कुठे आहे, अशी विचारणा केली.

ते सांगण्यास नकार दिल्याने धीरजला मारहाण करत उजव्या डोळ्यावर तलवारीने वार केला तसेच सुशीला सुरेश जाधव, यांची मोपेड, सिद्धेश राजू जगताप यांच्या दुचाकीची तोडफोड करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

संशयित हे सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करत आहेत.
 

Web Title: Kolhapur: Swords attacked by pre-eminence; Young injured