बर्मिंगहॅम येथे 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स' स्पर्धेत जलतरणपटू मंदार दिवसे यांना दोन सुवर्ण, एक रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:48 IST2025-07-04T12:46:14+5:302025-07-04T12:48:41+5:30

त्यांच्या या कामगिरीमुळे स्पर्धेत भारताचे नाव उंचाविले

Kolhapur swimmer Mandar Dishe won two gold medals at the ongoing World Police and Fire Games 2025 in Birmingham USA | बर्मिंगहॅम येथे 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स' स्पर्धेत जलतरणपटू मंदार दिवसे यांना दोन सुवर्ण, एक रौप्य

बर्मिंगहॅम येथे 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स' स्पर्धेत जलतरणपटू मंदार दिवसे यांना दोन सुवर्ण, एक रौप्य

कोल्हापूर : बर्मिंगहॅम (अमेरिका) येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पोलिस अ­ँड फायर गेम्स २०२५ च्या तिसऱ्या दिवशी, कोल्हापूरचे जलतरणपटू मंदार दिवसे यांनी दोन सुवर्णपदके पटकावली. त्यापैकी एक पदक ४०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात आणि पदक दुसरे ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले (पुरुष) गटामध्ये मिळविले. त्यांच्या या कामगिरीमुळे स्पर्धेत भारताचे नाव उंचाविले आहे.

स्पर्धेत दिवसे यांनी जलतरणाच्या विविध प्रकारात एकूण ३ पदके मिळविली. त्यात २ सुवर्ण व १ रौप्यपदकाचा समावेश आहे. दिवसे यांनी यापूर्वी कॅनडा (२०२३), चीन (२०१९) आणि अमेरिका (२०१७) येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दिवसे बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये निरीक्षक पदावर कार्यरत असून, बीएसएफच्या सेंट्रल अँक्वाटिक टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

Web Title: Kolhapur swimmer Mandar Dishe won two gold medals at the ongoing World Police and Fire Games 2025 in Birmingham USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.