कोल्हापूर: स्वाभिमानीची ऊस परिषद गर्दीने फुलली, पावसामुळे परिषदेला लवकर सुरवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 16:11 IST2022-10-15T16:10:54+5:302022-10-15T16:11:41+5:30
'काटा मारणाऱ्यांचा काटा काढणारच' ही टॅग लाईन असलेली टी-शर्ट घालून युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दाखल

छाया : नसीर अत्तार
जयसिंगपूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या यंदाच्या २१व्या ऊस परिषदेत महाराष्ट्र, कर्नाटक व सीमाभागातून दुपारपासूनच शेतकरी दाखल होत होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आगमनानंतर गर्दी वाढत गेली. हातात झेंडे घेऊन, छातीला बिल्ले लावुन शेतकरी दाखल होत होते. 'काटा मारणाऱ्यांचा काटा काढणारच' ही टॅग लाईन असलेली टी-शर्ट घालून युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दाखल होत होते. पावसाच्या भीतीमुळे लवकरच परिषदेला सुरवात झाली.
जयसिंगपूर येथे विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषदेसाठी दुपारपासूनच शेतकरी एकवटू लागले होते. युवकांच्या मोटरसायकल रॅलीने राजू शेट्टी यांचे तीन वाजता आगमन झाले. यावेळी क्रांती चौकात युवकांनी जल्लोष केला, फटाक्याची आतिषबाजी, हलगीचा आवाज, क्रांती चौक ते सभा स्थळापर्यंत फुलांचा सडा टाकण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्य ऊस परिषदेला कोल्हापूर ,सांगली ,सातारा सह कर्नाटक सीमाभागातील शेतकरी व कार्यकत्योनी मोठी गर्दी केली होती.