शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणाची पाहणी; गुरुवारी सुनावणी, चार ठिकाणीचे घेतले सांडपाण्याचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:39 PM

कोल्हापूर शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले.

ठळक मुद्दे पंचगंगा प्रदूषणाची पाहणीगुरुवारी सुनावणीचार ठिकाणीचे घेतले सांडपाण्याचे नमुने

कोल्हापूर : शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले.

सांडपाण्यामुळे होणाऱ्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार धरून महानगरपालिका प्रशासनावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून हे नमुने घेण्यात आले. दरम्यान, गुरुवारी करवीर तहसीलदार यांच्यासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सर्व सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असून काही नाले अडवून त्यातील सांडपाणी ‘एसटीपी’कडे वळविण्याचे कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण वाढले असल्याबाबत येथील प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.

त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार धरून महानगरपालिकेवर ‘कलम १३३’प्रमाणे कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईचाच एक भाग म्हणून तक्रारदार यांच्या समक्ष बुधवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील जयंती, दुधाळी, कसबा बावडा, बापट कॅम्प येथील चार नाल्यांचे सांडपाणी तसेच नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेतले.

यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेश कामत,  कडले, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड, महापालिका पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.गुरुवारी करवीर तहसीलदार यांच्यासमोर प्रदूषणासंदर्भात सुनावणी होणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरणार आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणenvironmentवातावरण