शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

कोल्हापूर : शाळा वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:52 IST

सर्वसामान्यांचे शिक्षण आणि शाळा वाचविण्यासाठी कोल्हापूरकर शुक्रवारी रस्त्यावर उतरणार आहेत. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, महापौर स्वाती यवलुजे करणार आहेत.

ठळक मुद्देशाळा वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर उतरणार रस्त्यावरजिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाशिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : सर्वसामान्यांचे शिक्षण आणि शाळा वाचविण्यासाठी कोल्हापूरकर शुक्रवारी रस्त्यावर उतरणार आहेत. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, महापौर स्वाती यवलुजे करणार आहेत.शासनाने राज्यातील शाळा बंद करून त्या कॉर्पोरेट कंपन्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या या धोरणाची सुरुवात कोल्हापुरातील काही शाळा बंद करून झाली.

शासनाच्या या धोरणाच्या विरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने गेल्या दोन महिन्यांपासून जनआंदोलन सुरू केले आहे. यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

गांधी मैदान येथून सुरू होणाऱ्या महामोर्चामध्ये पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि कोल्हापूरची जनता सहभागी होणार आहे. दरम्यान, या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारे संदेश गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर फिरत आहेत. या संदेशांचे गुरुवारी प्रमाण वाढले.

लोकशाही मार्गाने लढासर्वसामान्य नागरिकांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायम राहावा यासाठी शासनाच्या धोरणाविरोधात कृती समितीचा लोकशाही मार्गाने गेल्या दोन महिन्यांपासून लढा सुरू आहे. विविध पद्धतीने जनआंदोलन सुरू असताना शासनाकडून आंदोलन दडपण्याचा प्रकार झाला, तरीदेखील कोल्हापूरकरांचा लढा कायम असल्याचे समितीचे समन्वयक अशोक पोवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, समितीच्या आंदोलनाला जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाअंतर्गत असलेल्या २७ आणि अन्य १७ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. महामोर्चा आणि समितीची भूमिका नागरिकांना माहिती व्हावी. या उद्देशाने गेल्या २२ दिवसांपासून विविध शाळांमध्ये घेतलेल्या पालक सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात महिला पालकांची संख्या लक्षणीय होती.

सर्वसामान्यांचे शिक्षण आणि शाळा वाचविण्यासाठी शासनाला जागे करण्यासाठी हा महामोर्चा आयोजित केला आहे. त्यात सुमारे ५० हजार कोल्हापूरकर सहभागी होतील. मोर्चाद्वारे समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देणार आहे.

मोर्चाचा मार्ग असागांधी मैदान, खरी कॉर्नर, दैवज्ञ बोर्डिंग, मिरजकर तिकटी, देवल क्लब, बिंदू चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी