कोल्हापूर : जागेच्या वादातून वृद्धास मारहाण, बालिंगा येथील प्रकार : पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:41 IST2018-04-10T18:41:12+5:302018-04-10T18:41:12+5:30

बालिंगा (ता. करवीर) येथील घराचे जागेच्या वादातून वृद्धास पाच जणांनी काठीने बेदम मारहाण केली. जगन्नाथ बाबूू बागडी ऊर्फ गवाचार्य (वय ६५, रा. महादेव गल्ली, बालिंगा) असे जखमीचे नाव आहे.

Kolhapur: Suffer from old age to old age; Kind of kidnapping: Five people offense | कोल्हापूर : जागेच्या वादातून वृद्धास मारहाण, बालिंगा येथील प्रकार : पाच जणांवर गुन्हा

कोल्हापूर : जागेच्या वादातून वृद्धास मारहाण, बालिंगा येथील प्रकार : पाच जणांवर गुन्हा

ठळक मुद्देजागेच्या वादातून वृद्धास मारहाणबालिंगा येथील प्रकार : पाच जणांवर गुन्हा

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील घराचे जागेच्या वादातून वृद्धास पाच जणांनी काठीने बेदम मारहाण केली. जगन्नाथ बाबूू बागडी ऊर्फ गवाचार्य (वय ६५, रा. महादेव गल्ली, बालिंगा) असे जखमीचे नाव आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी संशयित उत्तम दत्तात्रय तोडकर (५०), दिलीप शामराव खोत (४५), सौरभ उत्तम तोडकर (२५), संदीप हंबीरराव तोडकर (२५), पप्पू बापूसो भवड (२५, सर्व रा. बालिंगा) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

अधिक माहिती अशी, जगन्नाथ बागडी आणि उत्तम तोडकर यांच्यात पूर्वीपासून घराच्या जागेवरून वाद आहे. बागडी हे औषध दुकानात सोमवारी (दि. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास जात असताना तोडकरसह अन्य संशयितांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. संशयितांना पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी नोटीस पाठविल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: Suffer from old age to old age; Kind of kidnapping: Five people offense