शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष

By समीर देशपांडे | Updated: November 23, 2024 12:28 IST

काँग्रेसला धक्का, आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव

समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक यांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांच्या शाहुपुरीतील संपर्क कार्यालयासमोर समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोषाला सुरूवात केली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे पुतणे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे कॉंग्रेसकडून रिंगणात होते. महाडिक यांनी १६ व्या फेरीअखेर १९ हजार ७५ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. अखेर महाडिक यांनी विजयी मैदान मारले.२०१४ साली केवळ १४ दिवसात महाडिक निवडणूक रिंगणात उतरून त्यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पाटील यांनी पुतणे ऋतुराज यांना दक्षिणमधून उतरवून महाडिक यांचा पराभव केला होता. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत महाडिक यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आणि एकूणच महाडिक परिवारासाठी अमल यांची जागा अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. अशा वेळी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेले अमल महाडिक विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र साडे अकरा वाजता पहावयास मिळाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणBJPभाजपाAmal Mahadikअमल महाडिकcongressकाँग्रेसRuturaj Patilऋतुराज पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024