शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

कोल्हापूर : निपाणीच्या सुशीला नाईक यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, पी. ए. गवळी यांची माहिती, बुधवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 6:08 PM

यंदाचा आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार निपाणी येथील देवदासी, जटानिर्मूलन आणि विडी कामगार संघटक कार्यकर्त्या सुशीला नाईक यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी (दि. ३) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वा. होणार असल्याची माहिती आबाजी सुबराव आणि आकुबाई आबाजी गवळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्राचार्य पी. ए.ग् ावळी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

ठळक मुद्दे११ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूपविडी कामगार संघटक कार्यकर्त्या सुशीला नाईक यांना पुरस्कार आबाजी सुबराव, आकुबाई आबाजी गवळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार

कोल्हापूर : यंदाचा आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार निपाणी येथील देवदासी, जटानिर्मूलन आणि विडी कामगार संघटक कार्यकर्त्या सुशीला नाईक यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी (दि. ३) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वा. होणार असल्याची माहिती आबाजी सुबराव आणि आकुबाई आबाजी गवळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्राचार्य पी. ए. गवळी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.गवळी म्हणाले, यंदाचे पुरस्काराचे हे २६ वे वर्ष आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना व गोरगरीब वंचितांसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येते. आबाजी सुबराव आणि आकुबाई आबाजी गवळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार नाईक यांना देण्यात येणार आहे.औपचारिक शिक्षण वाट्याला न आलेल्या व देवदासी असलेल्या सुशीला नाईक यांनी देवदासींच्या समस्या व त्यांच्या निर्मूलनासाठी काम केले. त्यांनी सावली देवदासी पुनर्वसन केंद्र उभे केले. या केंद्रामार्फत ठिकठिकाणी स्वस्त धान्य दुकाने आणि पाळणाघर चळवळ चालविली. आज त्यांची ५९ वर्षे झाली आहेत. त्यांना ११ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

साहित्यिक व विचारवंत लेखक राजा शिरगुप्पे, मंत्रालयाचे माजी सहसचिव सुरेश सोनावणे व सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव संजय भोसले, आदी मान्यवर वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पत्रकार बैठकीस सचिव प्रा. प्रज्ञावंत गौतम, सहसचिव प्रशांत गवळी, दिलीप गवळी, प्रफुल्ल गवळी, प्रवीण गवळी, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsocial workerसमाजसेवक