कोल्हापूर : महिलेशी असभ्य वर्तन; तरुणास बेदम चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:25 IST2018-10-05T18:23:13+5:302018-10-05T18:25:12+5:30

कोल्हापूर - पन्हाळा रोडवर खासगी प्रवासी वाहनातून कोल्हापूरला येणाऱ्या विवाहित महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या २0 वर्षांच्या तरुणास नागरिकांनी बेदम मारहाण केली.

Kolhapur: Rude behavior to women; Young people | कोल्हापूर : महिलेशी असभ्य वर्तन; तरुणास बेदम चोप

कोल्हापूर : महिलेशी असभ्य वर्तन; तरुणास बेदम चोप

ठळक मुद्देमहिलेशी असभ्य वर्तन तरुणास बेदम चोप

कोल्हापूर : कोल्हापूर - पन्हाळा रोडवर खासगी प्रवासी वाहनातून कोल्हापूरला येणाऱ्या विवाहित महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या २0 वर्षांच्या तरुणास नागरिकांनी बेदम मारहाण केली.

तोरस्कर चौकात शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधी महिला पोलिसांत तक्रार देण्यास तयार नसल्याने संशयित तरुणास सोडून दिले.

अधिक माहिती अशी, पन्हाळ्याहून खासगी प्रवासी वाहनातून लोक कोल्हापूरला येत होते. वाहनामध्ये प्रवाशांची गर्दी खूप होती. संशयित तरुणाने शेजारी बसलेल्या महिलेचा चिमटा काढला.

संतप्त महिलेने वाहन तोरस्कर चौकात आल्यानंतर थांबवले. खाली उतरून तरुणाला बेदम मारहाण केली. महिला मारहाण करीत असल्याचे पाहून चौकातील तरुणांनीही त्याची धुलाई केली.

सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. संबंधित महिला आपण तक्रार देणार नसल्याचे सांगून, निघून गेली. त्यानंतर चौकातील तरुणांनी या भामट्यास समज देऊन, सोडून दिले. या प्रकाराची दिवसभर परिसरात चर्चा होती.
 

 

Web Title: Kolhapur: Rude behavior to women; Young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.