शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कोल्हापूर : बाजार समितीत मुहूर्ताच्या गुळाला ५१०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:35 AM

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांत गुळास प्रतिक्विंटल ५१०० रुपयापर्यंत दर मिळाला. गूळ हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, मुहूर्ताच्या सौद्यांत शेतकऱ्यांना कमीत कमी २८०० दर मिळाला.

ठळक मुद्देकोल्हापूर बाजार समितीत मुहूर्ताच्या गुळाला ५१०० रुपयेमुहूर्ताच्या सौद्यांत शेतकऱ्यांना २८०० दर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांत गुळास प्रतिक्विंटल ५१०० रुपयापर्यंत दर मिळाला. गूळ हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, मुहूर्ताच्या सौद्यांत शेतकऱ्यांना कमीत कमी २८०० दर मिळाला.बाजार समितीत दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढले जातात. यंदा साताप्पा बुरगे यांच्या अडत दुकानात सकाळी नऊ वाजता सभापती कृष्णात पाटील व उपसभापती अमित कांबळे यांच्या हस्ते सौदा काढण्यात आला.

सभापती कृष्णात पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी वसविलेली गुळाची बाजारपेठ गुणवत्तापुर्ण व स्वच्छ गुळामुळे अधिक भक्कम झाली. देश व विदेशांत कोल्हापुरी गुळाने भुरळ घातली असून, याचे सगळे श्रेय शेतकरी, व्यापाऱ्यांना जाते. पण साखर कारखान्यांचा ऊसदर वाढत आहे.

गुळाचा उत्पादन खर्च व त्याला मिळणाऱ्या भावाची सांगड घालताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. आगामी काळात गुळाच्या दराचा प्रश्न महत्त्वाचा असून बाजार समिती चांगल्या दरासाठी प्रयत्नशील आहे.यावेळी संचालक विलास साठे, उत्तम धुमाळ, बाबूराव खोत, भगवान काटे, किरण पाटील, आनंदराव पाटील, सचिव मोहन सालपे, उपसचिव राजेंद्र मंडलिक, रामचंद्र खाडे, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलाईदार उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड