शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : ऐतिहासिक दसरा चौकाची दुरवस्था, मोदी विचार मंचचे महापालिका आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:10 PM

कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौक मैदान अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून, त्याकडे महापालिकेच्या प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

कोल्हापूर : येथील ऐतिहासिक दसरा चौक मैदान अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून, त्याकडे महापालिकेच्या प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मैदानाची दुरवस्था थांबवून त्याचे वैभव वाढावे यासाठी येत्या एक महिन्याच्या आत महानगरपालिकेने प्रयत्न करावेत; अन्यथा संघटनेच्या वतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ‘नरेंद्र मोदी विचार मंच’तर्फे गुरुवारी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आला.संस्थानकाळापासून ज्या ऐतिहासिक मैदानावर पारंपरिक पद्धतीने राजेशाही विजयादशमीनिमित्त सीमोल्लंंघन, शमीपूजन सोहळा पार पडतो. त्याची देशभर ख्याती आहे; परंतु या मैदानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे तिथे दुर्गंधी पसरली आहे.

मैदानावर वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग झालेले असते. अनेकजण लघुशंकेसाठी याचा वापर करतात. मद्यपींचाही येथे राजरोसपणे अड्डा जमलेला असतो. केएमटी बसथांबा आणि नियंत्रण कक्षाच्या केबिनने मैदानाचा एक भाग व्यापून गेला आहे. आता पावसाळ्यात चिखलामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात ‘मोदी विचार मंच’चे शहर संघटन प्रमुख सुनील सामंत, दीपाली खाडे, गणेश लाड, संजय चव्हाण, बाळासाहेब इंडिकर, राहुल नाईक, रोहित चव्हाण, भारत मोरे यांचा समावेश होता.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी