कोल्हापूर : ‘रयत क्रांती’ लोकसभा चार, विधानसभा २0 जागा लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:42 IST2018-03-22T17:42:31+5:302018-03-22T17:42:31+5:30
रयत क्रांती संघटनेचे राज्यव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर शनिवार व रविवार (दि. २५) असे दोन दिवस पन्हाळगडावर आयोजित केले आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत चार व विधानसभेच्या २० जागा संघटनेच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने व्युहरचना करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर : ‘रयत क्रांती’ लोकसभा चार, विधानसभा २0 जागा लढविणार
कोल्हापूर : रयत क्रांती संघटनेचे राज्यव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर शनिवार व रविवार (दि. २५) असे दोन दिवस पन्हाळगडावर आयोजित केले आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत चार व विधानसभेच्या २० जागा संघटनेच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने व्युहरचना करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संघटनेचे संस्थापक कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, प्रदेश युवाध्यक्ष शार्दुल जाधवर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. या दोनदिवसीय शिबिरासाठी संपूर्ण राज्यातून ५००हून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
संघटनेने राज्यातील ३६ जिल्हाध्यक्ष व ३६७ तालुकाध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभेच्या चार व विधानसभेच्या २० जागा संघटनेच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने व्युहरचना करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी काळात प्रत्येक गावात व शहरात शाखाप्रमुख व वॉर्डात बुथप्रमुखांची निवड करून निवडणुकीच्या मोर्चेबांधणीबाबत यावेळी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा संपर्कप्रमुख संतोष कांदेकर यांनी दिली आहे.