सदाभाऊंचे ‘घट’ बसले, रयत क्रांती संघटनेची घोषणा, यंदाचा ऊस दर मीच ठरवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:01 AM2017-09-22T05:01:42+5:302017-09-22T05:01:45+5:30

‘रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची स्थापना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी घटस्थापनेदिवशी कोल्हापुरात केली.

Sadbhau's 'decrease', the announcement of Raiyat Kranti Sanghatana, I will decide this sugarcane price this year | सदाभाऊंचे ‘घट’ बसले, रयत क्रांती संघटनेची घोषणा, यंदाचा ऊस दर मीच ठरवणार

सदाभाऊंचे ‘घट’ बसले, रयत क्रांती संघटनेची घोषणा, यंदाचा ऊस दर मीच ठरवणार

Next

कोल्हापूर : ‘रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची स्थापना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी घटस्थापनेदिवशी कोल्हापुरात केली. बत्तीस वर्षे शेतकºयांसाठी लढलो. कितीही संकटे, वादळे आली तरी त्यांना वेसण घालू, असे सांगून यंदा ऊसदरासाठी कोणाला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, आपण जो दर सांगू तोच अंतिम असेल, असा दावाही खोत यांनी केला.
मेळाव्यात बोलताना खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता टीका केली. आजचा दिवस येईल, असे कधीही वाटले नव्हते, पण नियतीच्या पोटात काय दडले होते, हे माहिती नसल्याचे सांगत खोत म्हणाले, बत्तीस वर्षांत संघर्षाने कधी पाठ सोडली नाही, हा प्रवास करत एका नव्या वळणावर उभा राहिलो आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन नव्या अध्यायाची सुरुवात करत आहोत. शरद जोशी यांनी शेतीचे अर्थकारण शिकविले आणि गावगाड्यातील अंगठाबहाद्दर शेतकºयांना बरोबर घेऊन राजकारणातील जहागीरदार, लक्ष्मीपुत्रांच्या बरोबर लढलो. दोन्ही कॉँग्रेसची राजवट उधळूून लावली, पण वतनदारी आडवी आली. मला संपविण्याबरोबरच माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप खोत यांनी केला.
सदाभाऊंना आली चक्कर
जिल्हा दौºयावर आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना गुरुवारी दुपारी १च्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे अचानक तब्येत बिघडल्याने चक्कर आली. त्यांना तत्काळ परिसरातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. सदाभाऊंवर तातडीने उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर ते पुढील कार्यक्र्रमासाठी रवाना झाले.
>बिल्ला काढण्याची हिंमत होणार नाही
छातीवर बिल्ला नसल्याने कुंकू नसलेल्या महिलेसारखी अवस्था झाल्याचे सांगत खोत म्हणाले, माझ्या आईने छातीवर बिल्ला लावल्याने तो काढण्याची कोणाची हिंमत होणार नाही. येथून पुढे कोणत्याही कार्यकर्त्याचा बिल्ला काढला जाणार नाहीच; पण कोणाची चौकशीही लावली जाणार नाही़

Web Title: Sadbhau's 'decrease', the announcement of Raiyat Kranti Sanghatana, I will decide this sugarcane price this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.