कोल्हापूरात संततधार; पंचगंगेची पाणी पात्राबाहेर, ३९ बंधारे पाण्याखाली
By राजाराम लोंढे | Updated: July 7, 2024 15:53 IST2024-07-07T15:52:57+5:302024-07-07T15:53:10+5:30
रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळच्या तुलनेत अकरापासून एकसारखा पाऊस सुरु आहे. दिवसभर संततधार कोसळत असून कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे.

कोल्हापूरात संततधार; पंचगंगेची पाणी पात्राबाहेर, ३९ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळ पासून संततधार सुरु आहे. दिवसभर एक सारखा पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा २९ फुटाच्या वरुन वाहत असून यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. तब्बल ३९ बंधारे पाण्याखाली गेल्यान या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यात रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळच्या तुलनेत अकरापासून एकसारखा पाऊस सुरु आहे. दिवसभर संततधार कोसळत असून कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस सुरु असल्याने नद्यांच्या पातळी झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेंकद १२५० तर वारणा धरणातून ६७५ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर फेकले असून आजूबाजूच्या शेतात घूसू लागले आहे. विविध नद्यांवरील ३९ बंधारे पाण्याखाली गेले असून दोन राज्य मार्ग व चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे.