शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

दहशत माजविणाऱ्या गावगुंडांची गल्लीबोळांत 'वरात', कोल्हापूर पोलिसांनी नागरिकांसमोर 'धुऊन' काढला दरारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:22 IST

पोलिसी खाक्या दाखवताच हात जोडले

कोल्हापूर : मित्राशी वाद घातलेल्या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर गांधी मैदानाजवळ जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीतील तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. ११) ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. तिघे राहत असलेल्या वारे वसाहतीतून त्यांना तपासासाठी फिरवले. पोलिसांनी धुलाई करून केलेला विशेष पाहुणचार आणि स्वत:च्या गल्लीत आरोपी म्हणून फिरवल्याने गुंडांचा नूर उतरला. ओम चेतन आवळे (वय २२), ऋत्विक साठे आणि एका अल्पवयीन मुलाचा यात समावेश होता.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीत राहणारा हर्षवर्धन उमेश मोरे (वय २७) याचा दहा दिवसांपूर्वी संभाजीनगर चौकात वैभव कुरणे याच्याशी किरकोळ कारणातून वाद झाला होता. याची माहिती कुरणे याने ओम आवळे या मित्राला दिली. त्यानंतर ५ जून रोजी रात्री ओम आवळे आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी पाठलाग करून गांधी मैदानाजवळ हर्षवर्धन याला मारहाण केली. त्याच्या दुचाकीची तोडफोड करून दहशत माजवली होती. शहरात मध्यवस्तीत घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाल्यानंतर पोलिस हल्लेखोरांच्या शोधात होते. यातील दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली, तर अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.वारंवार सूचना देऊनही वारे वसाहत आणि परिसरातील तरुणांकडून गुंडगिरी वाढत असल्याने पोलिसांनी हा विषय गांभीर्याने हाताळला. ताब्यात घेतलेल्या तिघांचा पोलिस ठाण्यात विशेष पाहुणचार करण्यात आला. काही वेळ त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणेही जमत नव्हते. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पुन्हा गुंडगिरी करणार नसल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील अन्य संशयितांचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.स्वत:च्याच गल्लीत मान खालीवारे वसाहतीत रुबाबात फिरून गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बुधवारी दुपारी तपासासाठी त्यांच्या परिसरातून फिरवले. पोलिसांच्या गाडीतून उतरतानाच तोंड वाकडे करून विव्हळणाऱ्या तिघांकडे पाहताच परिसरातील नागरिकांना त्यांच्या विशेष पाहुणचाराचा अंदाज आला. त्यावेळी तिघेही मान खाली घालून चालत होते. वारंवार हात जोडून ते पोलिसांकडे माफी मागत होते. यातील ऋत्विक साठे हा चालताना टंगळमंगळ करीत होता. त्यावेळी पोलिसांनी आवाज वाढवून त्याच्या बकोटीला हात घालताच त्याचे उरलेसुरले अवसानही निघून गेले.

बेड्या, काढण्या बंदचार-पाच वर्षांपूर्वी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बेड्या आणि काढण्या घालून किंवा दोरीने बांधून त्यांची धिंड काढली जात होती. यातून काहीवेळा संशयित आरोपींवर अन्याय व्हायचा. याचा संदर्भ घेऊन मानवतावादी दृष्टिकोनातून न्यायालयाने आरोपींची धिंड काढण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आता बेड्या, काढण्यांचा वापर होत नाही.पोलिस अधिकाऱ्यांचा इशाराआरोपींचे नातेवाईक आणि परिसरातील रहिवाशांना सार्वजनिक ठिकाणी बोलवून पोलिसांनी आरोपींचे कारनामे सांगितले. १६ ते २० वयोगटातील मुलांना वेळीच समज दिली नाही तर हेच उद्या मोठे गुन्हे करतील. एकमेकांचे खून पाडतील. त्यानंतर पालकांनी पश्चाताप करून काहीच होणार नाही. गुंडगिरी करण्याचा प्रयत्न पुन्हा कोणी केल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक झाडे यांनी दिला.