आलिशान कार चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 18:14 IST2022-01-08T13:43:18+5:302022-01-08T18:14:30+5:30

या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Kolhapur police arrest inter state gang members for stealing luxury cars | आलिशान कार चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

आलिशान कार चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

कोल्हापूर : आलिशान कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीवर कोल्हापुरात कारवाई करण्यात आली. कोल्हापूरपोलिसांनी आज, शनिवारी या टोळीला जेरबंद केले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींकडून सुमारे पाच कोटी रुपये किंमतीच्या ३१ आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी कर्नाटकातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जहीर अब्बास अब्दुल करीम दुकानदार (वय ४२, रा. क्रॉस मशीद गल्ली गांधीनगर, जिल्हा बेळगाव), यश प्रशांत देसाई (२६ रा. बोरमाळ शहापूर जिल्हा बेळगाव), खलील महंमद लियाकत सारवान (४० रा. सुभाषनगर जिल्हा बेळगाव ) अशी या संशयितांची तिघांची नावे आहेत. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Kolhapur police arrest inter state gang members for stealing luxury cars