शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

कोल्हापूर :टाळ-मृदंगाच्या गजरात उत्तरेश्वर पेठ दिंडी सोहळा, पंढरपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:55 AM

कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ विठ्ठल मंदिरामधील २८ वी आषाढी वारी पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यावेळी हरिभक्तांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देटाळ-मृदंगाच्या गजरात उत्तरेश्वर पेठ दिंडी सोहळा, पंढरपूरकडे प्रस्थानविठ्ठल मंदिर,आनंदी महाराज ट्रस्टतर्फे आयोजन

कोल्हापूर : टाळ-मृदंगाचा जल्लोष... खांद्यावर डौलणारी भगवी पताका! अभंगाच्या मधुर स्वरांच्या तालावर दंग झालेले हरिभक्त! आषाढातील पावसाच्या सरी झेलत ‘मनी पांडुरंगाच्या भेटीची लागली ओढ ! राम कृष्ण हरी’चा नामघोष अशा रम्य वातावरणात कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ विठ्ठल मंदिरामधील २८ वी आषाढी वारी पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यावेळी हरिभक्तांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

कोल्हापुरातील उत्तरेश्वर दिंडी सोहळ्याला वारकऱ्यांसह नागरिकांनी उत्तरेश्वर पेठ मार्गावर गर्दी केली होती. (छाया : दीपक जाधव)या दिंडी सोहळ्याचे ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आर. डी. पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, दिंडीचालक ह. भ. प. ज्ञानदेव ऊर्फ नाना पाटील, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर, आदींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले. उत्तरेश्वर पेठ विठ्ठल मंदिर व आनंदी महाराज मठतर्फे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.तत्पूर्वी, विठ्ठल मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक सोहळा, महापूजा, काकड आरती झाली व पंचपदी, भजन झाले. महादेव मंदिर येथे आरतीनंतर हा पायी दिंडी सोहळा शुक्रवार पेठ, महापालिका, लक्ष्मीपुरीमार्गे मार्केट यार्ड, शिरोली पुलाची, हातकणंगलेमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्यात कसबा बावडा, आसुर्ले-पोर्ले, बोलोली, राशिवडे, आदी गावांतील वारकऱ्यांचा सहभाग होता.गुरुवर्य तात्यासाहेब वासकर यांचा कृपाशीर्वाद आणि कोल्हापूर जिल्हा वारकरी संप्रदायप्रणित या आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावेळी नगरसेविका माधवी गवंडी, गजानन चव्हाण, बाळासाहेब पाटील, अप्पासाहेब मोरे, स्वानंद जाधव, रोहन जाधव, अरुण नाझरे, श्रीधर एतावडेकर, नंदकुमार राऊत, संदीप तळसकर, संजय सुतार, गणपतराव चौगले, विजय एतावडेकर, चोपदार दिलीप माडेकर, संजय यादव, मुरलीधर एतावडेकर, चंद्रकांत काकडे, पांडुरंग माळवदे, परशराम घाटगे, अनिल राबाडे, आदी उपस्थित होते.

असा राहणार मार्गहातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, शिरढोण, खुर्ची नागज, जुनौनी, पाचेगाव, वाटबरे, सांगोलामार्गे शनिवारी (दि. २१) पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर येथे.

नव्या पिढीने वारकरी संप्रदायाकडे वळले पाहिजे. भक्तीतील आनंद लुटणे गरजेचे आहे.- ह.भ.प. ज्ञानदेव ऊर्फ नाना पाटील, दिंडीचालक

 

 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीkolhapurकोल्हापूर