शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कोल्हापूर : पंकजा मुंडे यांचा दौरा रद्द; जिल्हा परिषदेत हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 5:54 PM

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने जिल्हा परिषदेत सुटीदिवशीही केलेल्या तयारीवर आणि पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा दौरा रद्द; जिल्हा परिषदेत हिरमोडकाही घरात, काही वाटेत, काही जिल्हा परिषदेत

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने जिल्हा परिषदेत सुटीदिवशीही केलेल्या तयारीवर आणि पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले.बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुंडे येणार होत्या. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हा परिषदेला त्यांची भेट ठरली होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजता हा निरोप मिळाल्यानंतर सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, सभापती यांना येण्याचे निरोप देण्यात आले.अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. सौरऊर्जा यंत्रणेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्याचे ठरल्याने तेथेही तयारी सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत थांबून सादरीकरणासाठी बुकलेटही तयार करण्यात आली. त्यांची पहिलीच जिल्हा परिषद भेट असल्याने जिल्हा परिषदेच्या अडचणी आणि मागण्यांचे निवेदन तयार करण्यासाठी सर्व विभागांकडून प्रश्न आणि मागण्याही मागविण्यात आल्या व निवेदनेही तयार करण्यात आली.दुसऱ्या शनिवारची सुटी असली तरीही सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी जिल्हा परिषदेत सकाळी साडेआठपासूनच उपस्थित होते, परंतु साडेआठच्या सुमारास पंकजा मुंडे यांचा दौरा रद्द झाल्याचा अधिकृत निरोप त्यांच्या स्वीय सहायकांनी दिला आणि सर्वांचाच हिरमोड झाला.

तातडीने चार कर्मचाऱ्यांनी सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापतींना फोन लावून कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली.

काही घरात, काही वाटेत, काही जिल्हा परिषदेतकार्यक्रम रद्द झाल्याचा निरोप मिळेपर्यंत काही सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचले होते. काही वाटेतच होते, तर जवळचे काही सदस्य घरातच होते. त्यांना याबाबत निरोप मिळाल्याने बहुतांशी जण कोल्हापूरला आलेच नाहीत.

सीईओंनी घेतली आढावा बैठकसप्टेंबरमध्ये पंचायत राज समितीचा दौरा कोल्हापूरला होणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सर्व विभागांमध्ये त्याची तयारी सुरू आहे. अनायासे सर्व विभागप्रमुख उपस्थित असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्वांची आढावा बैठक घेऊन पंचायत राज समिती दौऱ्याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. 

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेkolhapurकोल्हापूर