शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

कोल्हापूर : विदर्भामध्ये शाहू महाराजांच्या पहिल्या पुतळ्याची उभारणी, संभाजीराजे, जयसिंगराव पवारांच्या उपस्थितीत गुरुवारी अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 6:20 PM

समाजसुधारणेसाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा विदर्भामधील पहिला पुतळा अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्याच्या शहरामध्ये उभारण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व शाहू चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे विदर्भामध्ये शाहू महाराजांच्या पहिल्या पुतळ्याची उभारणीसंभाजीराजे, जयसिंगराव पवारांच्या उपस्थितीत गुरुवारी अनावरणकोल्हापूरवासीयांसाठी आनंदाची बाब

समीर देशपांडेकोल्हापूर : समाजसुधारणेसाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा विदर्भामधील पहिला पुतळा अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्याच्या शहरामध्ये उभारण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व शाहू चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या ११ व्या अधिवेशनाच्या निमित्ताने दि. १७ डिसेंबर १९१७ रोजी छत्रपती शाहू महाराजांनी विदर्भाचा (खामगाव)दौरा केला होता. त्याला २७ डिसेंबर २०१७ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली.

या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले होते. शिक्षणाशिवाय चांगला शिक्षक, चांगला शेतकरी, चांगला सैनिकही तयार होणार नाही. यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, अशी विदर्भामध्ये पहिली मांडणी शाहू महाराजांनी केली होती.या परिषदेला त्यावेळी उपस्थित असलेले तरुणवयातील पंजाबराव देशमुख भारावून गेले आणि या भाषणांतूनच प्रेरणा घेऊन त्यांनी अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू केल्या. या शाहू महाराजांच्या भाषणाला आणि विदर्भ दौऱ्याला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.अकोला जिल्ह्यातील अकोट येथील राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शाहूप्रेमी भाऊसाहेब पोटे यांच्या प्रेरणेने हा पुतळा या शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आला आहे. या शिक्षण संस्थेचेही हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून पोटे हे डॉ. पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचेही सल्लागार आहेत.डॉ. पवार आणि पोटे यांच्यामध्ये गेल्यावर्षी याबाबत चर्चा झाल्यानंतर कोल्हापूरचे प्रसिद्ध शिल्पकार किशोर पुरेकर यांच्याकडे या पुतळ्याचे काम देण्याचा निर्णय झाला. पुरेकर यांनीही हे काम पूर्ण करून पुतळा अकोटकडे पाठविला आहे.

कोल्हापूरवासीयांसाठी आनंदाची बाबविदर्भामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पहिला पुतळा उभारला जातोय; ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली आहे. काळाच्या पुढे पाहणाऱ्या या राजाच्या आवाहनामुळे विदर्भामध्ये शैक्षणिक क्रांती झाली. त्याविषयीची कृतज्ञता म्हणूनच हा पुतळा अकोटमध्ये उभारला जात आहे.

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर