शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

कोल्हापूर : बहारदार सादरीकरणाने बालनाट्य स्पर्धेचा पडदा उघडला, बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:38 PM

अभ्यासी पोेपटपंची करणारी बालपिढी, ग्रंथालयांचे महत्व, बालकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना अशा बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श करत झालेल्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा पडदा शनिवारी उघडला.

ठळक मुद्देकेशवराव भोसले नाट्यगृहात सुरू झाल्या राज्य बालनाट्य स्पर्धाशिंदे अ‍ॅकॅडमीच्या सोनेरी पिंजऱ्यातील पोपट नाटकाने उघडला पडदा

कोल्हापूर : अभ्यासी पोेपटपंची करणारी बालपिढी, ग्रंथालयांचे महत्व, बालकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना अशा बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श करत झालेल्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा पडदा शनिवारी उघडला.कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन नाट्यगृहाचे व्यवस्थापक विजय वणकुद्रे, लिपीक उदय माने, परीक्षक सुरेश पुरी, रमेश भिशीकर, सारीका पेंडसे यांच्या हस्ते झाले.या स्पर्धेचा पडदा उघडला तो यापूर्वीच्या राज्य नाट्य स्पर्धांमध्येही पारितोषिक मिळवलेल्या शिंदे अ‍ॅकॅडमीच्या सोनेरी पिंजऱ्यातील पोपट या नाटकाने. आजच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या नाटकात केवळ पुस्तकी पोपटपंची आणि घोकंपट्टी करणाऱ्या बालमनाच्या व्यथा आणि पालकांची मानसिकता मांडली आहे.

केवळ परीक्षेत अव्वल येणारे विद्यार्थी पुढे आयुष्यात यशस्वी होतीलच असे नाही. ही मुलेशिक्षण पद्धतीत भरडली जात असताना आपल्या कलाकौशल्य, अंगभूत गुणांपासून वंचित झालेली असतात.

इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळा, भक्कम फी घेणारे क्लासेस, पालकांच्या मोठ्या अपेक्षा, शिक्षकांचा प्रमाणाबाहेर हस्तक्षेप यामुळे आजचा विद्यार्थी सोनेरी पिंजऱ्यांत अडकला आहे. सोन्याचा असला तरी तो पिंजरात आहे हे पालकांनी विसरता कामा नये. अन्यथा विद्यार्थ्यांच्या वाट्याला निराशेचे काळे ढग येतात असा मतितार्थ या नाटकाने मांडला.डॉ. सतिश साळूंखे यांचे लेखन असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सुनिल शिंदे यांनी केले आहे. नेपथ्य रजत सोनार व शुभम सोनारचे असून प्रकाशयोजना प्रसन्न देशमुख, अजय इंगवले यांनी केली आहे. रंगभूषा व वेशभूषा ललिता शिंदे यांची असून गौतम राजहंस यांनी संगीत दिले आहे.

नाटकात आकांक्षा देशमुख, ऋषिकेश गुदगे, रमा कुलकर्णी, भाग्यदा नाईक, पुण्यदा नाईक, स्वरा कलस, आदित्यराजे सूर्यवंशी, निरज कौलगी, सूजल बेलवलकर, अद्वैत फणसळकर, ओंकार कोकाटे, विदुला चौगूले, वेदांत कांबळे, आर्या फणसळकर या विद्यार्थ्यांनी भूमिका निभावल्या.व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल (शांती अन् चेतन), विद्या प्रसारक मंडळ (बसराची ग्रंथपाल), विद्यापीठ हायस्कूल (माझं काय चुकलं?), आचरेकर प्रतिष्ठान (निसर्गचित्र), श्रीवरा व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट (वाट चुकलेली माणसं) या संस्थांची नाटके सादर झाली.रविवारची नाटके (सकाळी दहा वाजल्यापासून)निवडक (पल्लवी जोशी), मदर्स डे (सदगुरूपंत महाराज शिक्षण मंडळ, इचलकरंजी), गुलमकई(श्रीराम दयाळ मालू हायस्कूल सांहली), जयोस्तुते (गंगामाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी), गोष्ट पछाडलेल्या वाड्याची(ए.बी.पाटील इंग्लिश स्कूल सांगली), वृक्षवल्ली(सरस्वती वाचनालय बेळगाव), वयम मोठम खोटम (म.के. आठवले विनय मंदिर सांगली.)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूक