कोल्हापूर :  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 05:52 PM2018-05-22T17:52:38+5:302018-05-22T17:52:38+5:30

पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी वयोवृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना रविवारी (दि. २०) रात्री नागाळा पार्क परिसरात घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.

Kolhapur: The old man's mangalasutra snuffed out by asking the question | कोल्हापूर :  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले

कोल्हापूर :  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले

Next
ठळक मुद्देपत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावलेनागाळा पार्क परिसरात घटना, शाहूपुरी पोलिसांत नोंद

कोल्हापूर : पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी वयोवृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना रविवारी (दि. २०) रात्री नागाळा पार्क परिसरात घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नागाळा पार्क वारणा कॉलनी येथील सुचेता यशवंत गाडगीळ (वय ७०, बी २, रा. यशोदा अपार्टमेंट) या रविवारी रात्री जेवण करून घराजवळ फिरत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोन अज्ञात त्यांच्याजवळ आले.

पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञाताने हिसडा मारून पळवून नेले. गाडगीळ यांनी याबाबत फिर्याद दिली.

 

Web Title: Kolhapur: The old man's mangalasutra snuffed out by asking the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.