कोल्हापूर :  अधिकाऱ्याने सॅल्युट मारून हवालदारास निरोप, जपली वेगळी भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:34 AM2018-11-09T11:34:33+5:302018-11-09T11:38:00+5:30

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांला सॅल्युट मारणे नियम आहे; परंतु अधिकाऱ्यांने हवालदाराला सॅल्युट मारून आदराप्रीत्यर्थ सेवानिवृत्तीचा निरोप देण्याची घटना कोल्हापुरात प्रथमच पाहायला मिळाली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांनी सेवानिवृत्त झालेल्या हवालदार चंद्रकांत जाधव यांचा पोलीस ठाण्यात विशेष सत्कार करून त्यांना कारपर्यंत सोडले. स्वत: दरवाजा उघडून त्यांना कारमध्ये बसविले आणि सॅल्युट मारून निरोप दिला.

 Kolhapur: The officer hurled a knock on the steward and sent a different feeling | कोल्हापूर :  अधिकाऱ्याने सॅल्युट मारून हवालदारास निरोप, जपली वेगळी भावना

कोल्हापूर पोलीस दलातील सेवानिवृत्त हवालदार चंद्रकांत जाधव यांचा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सत्कार करून त्यांना सॅल्युट मारून निरोप देताना पोलीस निरीक्षक वसंत बाबर.

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्याने सॅल्युट मारून हवालदारास निरोप, जपली वेगळी भावना पोलिस निरीक्षक बाबर यांचा आदर्श

कोल्हापूर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांला सॅल्युट मारणे नियम आहे; परंतु अधिकाऱ्यांने हवालदाराला सॅल्युट मारून आदराप्रीत्यर्थ सेवानिवृत्तीचा निरोप देण्याची घटना कोल्हापुरात प्रथमच पाहायला मिळाली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांनी सेवानिवृत्त झालेल्या हवालदार चंद्रकांत जाधव यांचा पोलीस ठाण्यात विशेष सत्कार करून त्यांना कारपर्यंत सोडले. स्वत: दरवाजा उघडून त्यांना कारमध्ये बसविले आणि सॅल्युट मारून निरोप दिला.

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त हवालदार चंद्रकांत जाधव यांचा सहकुटुंब सत्कार करताना पोलीस निरीक्षक वसंत बाबर.

पोलीस निरीक्षक बाबर यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार झाला. बाबर यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन स्वत: त्यांना कारमध्ये बसविले. कारचे दार बंद करून सर्व पोलिसांसमोर सॅल्युटही देऊन मानवंदना दिली. कर्मचारी सेवेत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोज सॅल्युट करतात; मात्र पोलीस निरीक्षक बाबर यांनी दिलेल्या मानवंदनेने ते कृतज्ञ झाले.

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते शिरोळ पोलीस ठाणे येथील सहायक फौजदार राजन शिवराम चव्हाण यांचा तसेच पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्या हस्ते आजरा पोलीस ठाणे येथील सहायक फौजदार विष्णू कृष्णा नाईक, नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार सुभाष बळवंत पाटील यांचा सत्कार झाला.

कारकिर्दीत बजाविलेली सेवा, आरोपींना अटक करण्यासाठी केलेली व्यूहरचना आणि बजाविलेले कर्तव्याचे अनुभव या कर्मचाऱ्यांनी सांगितले. काहीजण भावूकही झाले.


 

Web Title:  Kolhapur: The officer hurled a knock on the steward and sent a different feeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.