कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:08 IST2022-04-08T12:08:11+5:302022-04-08T12:08:39+5:30

कोल्हापूर : ‘ कोल्हापूर उत्तर’साठी भाजपने जोर लावला असून, सत्यजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या शनिवारी सायंकाळी ७ ...

Kolhapur North by election Meetings of former Chief Minister Devendra Fadnavis, MP Udayan Raje | कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’साठी भाजपने जोर लावला असून, सत्यजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या शनिवारी सायंकाळी ७ वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने होणार आहे, तर खासदार उदयनराजे यांचा आज शुक्रवारी रोड शोही आयोजित करण्यात आला आहे.

गेले दोन दिवस उदयनराजे यांच्या दौऱ्यासाठी भाजपच्या पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्यानुसार आता आज शुक्रवारी दुपारी चार वाजता उभा मारूती चौक, महाव्दार रोड ते शिवाजी पुतळा असा त्यांचा रोड शो होणार आहे. माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे आज कोल्हापुरात येत असून, ते तेली समाजाचा मेळावा घेणार आहेत.

शनिवारी सायंकाळी ७ वाजता पेटाळा मैदान येथे फडणवीस यांची सभा होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेदेखील त्यांच्यासमवेत सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. महिला नेत्या चित्रा वाघ या पुन्हा या सभेसाठी येण्याची शक्यता असून, दोन दिवसात पदयात्रा आणि कॉर्नर सभांनी वातावरण ढवळून टाकण्याचे नियोजन भाजपने केले आहे.

भाजपने या निवडणुकीसाठी ताकद लावली असून, बाहेरील खासदार, आमदार, महापौर कोल्हापुरात दाखल झाले आहेत. संघटनेतील महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकारी गेले काही दिवस येथे तळ ठोकून असून, त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

Web Title: Kolhapur North by election Meetings of former Chief Minister Devendra Fadnavis, MP Udayan Raje