शाहूवाडी : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर खुटाळवाडी गावानजीक कोल्हापूरच्या दिशेने , बांबवडेकडे ऊस भरून जात असलेल्या ट्रकने पाठीमागून मोटरसायकलवरील दोन युवकांना धडक दिली. या अपघातात आंबर्डे तालुका शाहुवाडी येथील सैन्य भरतीसाठी गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. पारस आनंदा परीट (वय 19), सुरज ज्ञानदेव उंड्रीकर (वय 20) अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत. या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आंबर्डे येथील पारस परीट व सुरज उंड्रीकर हे दोन युवक कोल्हापूर येथे सैन्य भरतीसाठी शनिवार 15 नोव्हेंबर रोजी गेले होते. रविवार 16 नोव्हेंबर रोजी ते सायंकाळच्या दरम्यान आपल्या आंबर्डे गावी परत येत होते. यावेळी बांबवडे नजीक खुटाळवाडी गावच्या हद्दीत कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बांबवडेच्या दिशेने ऊस भरलेला ट्रक येत होता. या ट्रकची मोटरसायकलवर असलेल्या या दोन्ही युवकांना पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.
धडक इतकी जोराची होती दोन्ही युवकांच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली. डोक्याचा चेंदामेंदा झालेली स्थिती घटनास्थळी दिसत होती. अपघात स्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर ट्रक चालक पळून जात असता नागरिकांनी त्याला पकडले. अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस व शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृत युवकांना मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले.
Web Summary : Two youths returning from army recruitment died instantly near Khutalwadi. A speeding sugarcane truck hit their motorcycle. Paras Parit and Suraj Undrikar were identified as the deceased. Police are investigating the incident.
Web Summary : सेना भर्ती से लौट रहे दो युवकों की खुटाळवाड़ी के पास दुर्घटना में तत्काल मौत हो गई। गन्ना लदे ट्रक ने उनकी मोटरसाइकिल को टक्कर मार दी। मृतकों की पहचान पारस परीट और सूरज उंद्रीकर के रूप में हुई। पुलिस मामले की जांच कर रही है।