शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात कोल्हापूर महानगरपालिकेचा ‘शाहू पॅटर्न’ राज्यात अव्वल; स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी एकमेव महानगरपालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:52 IST

विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून ‘इस्रो’ या जागतिक दर्जाच्या संस्थेचा शैक्षणिक अभ्यास दौरा विमान प्रवासाद्वारे घडवून आणला जात आहे

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती’ योजनेच्या रकमेत लक्षणीय वाढ करून ही शिष्यवृत्ती आता २४०० रुपयांवरून थेट ५,००० रुपये करण्यात आली आहे.शासनाच्या शिष्यवृत्तीच्या बरोबरीची स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर ही एकमेव महानगरपालिका ठरली आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या उद्देशाने महापालिका दोन सराव चाचण्या व एक अंतिम सराव परीक्षा घेते. यातील गुणवत्ता यादीत पहिल्या २५ क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षांसाठी ही ‘शाहू शिष्यवृत्ती’ प्रदान केली जाते.महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार तसेच सहायक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जात आहेत. तत्कालीन उपायुक्त साधना पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, परीक्षा विभाग प्रमुख संजय शिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.इस्रो’दौऱ्याचा खर्चविशेष बाब म्हणजे, राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून ‘इस्रो’ या जागतिक दर्जाच्या संस्थेचा शैक्षणिक अभ्यास दौरा विमान प्रवासाद्वारे घडवून आणला जात आहे आणि या संपूर्ण दौऱ्याचा खर्च कोल्हापूर महानगरपालिका स्वतः उचलत आहे.अनुकरणीय पॅटर्नफक्त पाचवीच नव्हे, तर इयत्ता पहिली व दुसरीसाठी ‘कोल्हापूर टॅलेंट सर्च’ तिसरी व सहावीकरिता प्रज्ञाशोध परीक्षा, तसेच चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करून महापालिकेने शिक्षणाचा एक आदर्श व अनुकरणीय पॅटर्न उभा केला आहे.

“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.” -के. मंजुलक्ष्मी, आयुक्त.“महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्तीइतकीच ५,००० रुपयांची रक्कम आता मनपाकडून विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.” - डी. सी. कुंभार, प्रशासन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Corporation's 'Shahu Pattern' Tops State in Education

Web Summary : Kolhapur Municipal Corporation's 'Shahu Scholarship' increased to ₹5,000, matching government aid. Students visit ISRO, fully funded by the corporation. The municipality conducts talent search exams for various grades, setting an example in education.