शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

क्षयरोग दुरीकरणात कोल्हापूर महापालिका राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 10:29 AM

Tb, Health hospital Kolhapur- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेने उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये संशयित क्षयरूग्णांची तपासणी, सरकारी व खासगी दवाखान्यात क्षयरूग्ण शोधकाम (केस नोटिफेकशन), क्षयरूग्णांची एच. आय. व्ही. आणि डी. एम. तपासणी, क्षयरूग्णांसाठी पोषण आहार भत्ता अदा करणे याचा समावेश आहे.

ठळक मुद्दे राज्यात उद्दिष्टे पूर्ण करणारी महापालिका आरोग्य विभागाच्या कामांना यश

कोल्हापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेने उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये संशयित क्षयरूग्णांची तपासणी, सरकारी व खासगी दवाखान्यात क्षयरूग्ण शोधकाम (केस नोटिफेकशन), क्षयरूग्णांची एच. आय. व्ही. आणि डी. एम. तपासणी, क्षयरूग्णांसाठी पोषण आहार भत्ता अदा करणे याचा समावेश आहे.राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिका यांच्याकडून २०२०मध्ये झालेल्या कामकाजाचा वार्षिक आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग विभागाने शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच उद्दिष्टांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के काम पूर्ण केल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याचे कुष्ठ आणि क्षयरोग विभागाचे सहायक संचालकांनी जाहीर केले.महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी उद्दिष्टपूर्तीसाठी सरकारी आणि खासगी दवाखाने यांच्याकडे निदान होणाऱ्या सर्व क्षयरूग्णांची नोंदणी शासनाकडे केली. रूग्णांना आरोग्य तपासणी आणि शासनाचे इतर लाभ मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.

या कामासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपआयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका