Kolhapur: टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 23:37 IST2025-02-25T23:37:20+5:302025-02-25T23:37:44+5:30

Kolhapur: यड्राव फाटा ते कोरोचीकडे जाणाºया मार्गावरभरधाव टेम्पोचालकाने मोटारसायकलस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला.

Kolhapur: Motorcyclist killed in collision with tempo | Kolhapur: टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार  

Kolhapur: टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार  

इचलकरंजी - यड्राव फाटा ते कोरोचीकडे जाणाºया मार्गावरभरधाव टेम्पोचालकाने मोटारसायकलस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. रवीकांत राजाराम भंडारे (वय ६१, रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी दहा वाजता घडला. याबाबत टेम्पोचालक कय्युम इकबाल शेख (रा. यड्राव, ता.शिरोळ) याच्याविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कय्युम हा टेम्पो (एमएच ०९ एफएल ६१७३) ने यड्राव फाटा ते कोरोची मार्गावरून निघाला होता. त्यावेळी त्याच दिशेने निघालेल्या रवीकांत यांच्या मोटारसायकल (एमएच ०९ डीबी १४५१) ला त्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रवीकांत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Kolhapur: Motorcyclist killed in collision with tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.