Kolhapur: सोहाळेत गव्याच्या हल्ल्यात आई व मुलगा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 22:45 IST2024-05-25T22:45:29+5:302024-05-25T22:45:46+5:30
Kolhapur News: सोहाळे ( ता.आजरा ) येथे गव्याच्या हल्ल्यात विमल मारुती दोरुगडे ( वय ७० ) व सुनील मारुती दोरुगडे ( वय ४० ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी ७.३० वा. सुमारास घडली. शेतकऱ्यांवरील गव्यांचे हल्ले वाढल्यामुळे सर्वत्र भिती व्यक्त होत आहे.

Kolhapur: सोहाळेत गव्याच्या हल्ल्यात आई व मुलगा गंभीर जखमी
आजरा - सोहाळे ( ता.आजरा ) येथे गव्याच्या हल्ल्यात विमल मारुती दोरुगडे ( वय ७० ) व सुनील मारुती दोरुगडे ( वय ४० ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी ७.३० वा. सुमारास घडली. शेतकऱ्यांवरील गव्यांचे हल्ले वाढल्यामुळे सर्वत्र भिती व्यक्त होत आहे.
विमल दोरुगडे व त्यांचा मुलगा सुनिल दोरुगडे हे दोघे शेताकडून घरी येत होते. गावाजवळील पूलाशेजारी अचानक गव्याने दोघांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये विमल दोरुगडे यांच्या डोकीला, हाताला व पायाला तर सुनिल यांच्या हाताला, पायाला व पाठीत गंभीर मार लागला आहे. दोघांनाही तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी व वनरक्षक प्रियांका पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेतली. दोघेही गंभीर जखमी असल्यामुळे प्राथमिक उपचार करून त्यांना गडहिंग्लज येथे दाखल केले आहे. शेतकऱ्यांवरील गव्यांचे हल्ले वाढले असल्याने नागरिकांतून भिती व्यक्त होत आहे.