कोल्हापूर : लग्नसमारंभातून प्राध्यापकाची साहित्याची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:13 IST2019-01-07T15:11:52+5:302019-01-07T15:13:28+5:30

कोल्हापूर येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये लग्नसभारंभात सगळे व्यस्त असताना रुममधून प्रा. शरद नावरे यांची साहित्याची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये कॅमेरा, लेन्स, आयफोन असा सुमारे १ लाख ९० हजार किंमतीचे साहित्य होते. रविवारी (दि. ६) भरदूपारी हा प्रकार घडला.

Kolhapur: Lepass of Professor's literature bag from the wedding ceremony | कोल्हापूर : लग्नसमारंभातून प्राध्यापकाची साहित्याची बॅग लंपास

कोल्हापूर : लग्नसमारंभातून प्राध्यापकाची साहित्याची बॅग लंपास

ठळक मुद्देलग्नसमारंभातून प्राध्यापकाची साहित्याची बॅग लंपाससुमारे १ लाख ९० हजार किंमतीचे साहित्य गायब

कोल्हापूर : येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये लग्नसभारंभात सगळे व्यस्त असताना रुममधून प्रा. शरद नावरे यांची साहित्याची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये कॅमेरा, लेन्स, आयफोन असा सुमारे १ लाख ९० हजार किंमतीचे साहित्य होते. रविवारी (दि. ६) भरदूपारी हा प्रकार घडला.

अधिक माहिती अशी, शिवाजी विद्यापीठातील प्रा. नावरे (वय ६६, रा. गोवारीकर पार्क, सम्राटनगर) यांच्या मुलाचे लग्न रविवारी धैर्यप्रसाद हॉल येथे होते. त्यांनी हॉल आणि येथील खोल्या बुकींग केल्या होत्या. दोन्ही बाजूकडील नातेवाईक लग्नसमारंभात व्यस्त होते.

नावरे यांनी लग्नाचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा, लेन्स आणि आयफोन बॅगेतून आणला होता. बॅग रुम नंबर ५ मध्ये ठेवली होती. दूपारी ते बॅग घेण्यासाठी रुममध्ये गेले असता बॅग गायब असल्याचे दिसून आले. आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. बॅग चोरीला गेलेची खात्री झाल्यानंतर त्यांनी शाहुपूरी पोलीसात फिर्याद दिली. येथील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्याचा माग पोलीस काढत आहेत.
 

Web Title: Kolhapur: Lepass of Professor's literature bag from the wedding ceremony