कोल्हापूर केएमटी कर्मचारी सोसायटी निवडणुकीत ४१ जण रिंगणात
By भीमगोंड देसाई | Updated: December 27, 2023 15:48 IST2023-12-27T15:47:49+5:302023-12-27T15:48:03+5:30
कोल्हापूर : टेंबेे रोडवरील केएमटी कामगार सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत ४१ जण रिंगणात आहेत. संस्थेच्या इमारतीमध्ये ५ जानेवारीला मतदान होणार ...

कोल्हापूर केएमटी कर्मचारी सोसायटी निवडणुकीत ४१ जण रिंगणात
कोल्हापूर : टेंबेे रोडवरील केएमटी कामगार सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत ४१ जण रिंगणात आहेत. संस्थेच्या इमारतीमध्ये ५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
सोसायटीची स्थापना १९६३ साली झाली आहे. एकूण ३५८ सभासद आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल १५ कोटी आहे. यापूर्वी सोसायटीची निवडणूक सन २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर कोरोनामुळे निवडणूक झाली नाही. तानाजी मेंगाणे अध्यक्ष तर हनुमान लोहकरे उपाध्यक्ष आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन माने आहेत.
आता १३ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. रिंगणातील उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. ५ जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होईल. त्यानंतर मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल.