शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोल्हापूर कलामहोत्सव : संगीताच्या साथीने चित्र- शिल्पाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:38 IST

व्यासपीठावर सुरू असलेली सुरांची मैफल आणि भव्य दालनात चित्रकारांचे कॅनव्हासवर मुक्त फटकारे, रंगातून उमटलेली चित्रकृती, वळणदार बोटांनी साकारलेले शिल्प, अशा विविध कलाविष्कारांनी कोल्हापूर कलामहोत्सवात रंगत आणली.

ठळक मुद्देकोल्हापूर कलामहोत्सव : संगीताच्या साथीने चित्र- शिल्पाविष्कार

कोल्हापूर : व्यासपीठावर सुरू असलेली सुरांची मैफल आणि भव्य दालनात चित्रकारांचे कॅनव्हासवर मुक्त फटकारे, रंगातून उमटलेली चित्रकृती, वळणदार बोटांनी साकारलेले शिल्प, अशा विविध कलाविष्कारांनीकोल्हापूरकलामहोत्सवात रंगत आणली.दसरा चौकातील मैदानावर कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने आयोजित कलामहोत्सवात मान्यवर कलावंतांच्या प्रात्यक्षिकांनी कला महाविद्यालयांतील विद्यार्थीच नव्हे, तर रसिक कोल्हापूरकरांचेही कलाविश्व समृद्ध केले.कलामहोत्सवात सकाळी चित्रकार विजय टिपुगडे, शिवाजी म्हस्के, आदिती कांबळे, सुनील पंडित, आर. एस. कुलदीप, नेहा जाधव या चित्रकारांनी निसर्गचित्र, पोट्रेट, अ‍ॅबस्ट्रॅक अशा विविध प्रकारांतील चित्र कॅनव्हासवर अवतरले. तर समृद्धी पुरेकर यांनी पोलीस बांधवांचे व्यक्तिचित्रण करून त्यांच्या कामाचा सन्मान केला. शिल्पकार अतुल डाके व किशोर पुरेकर यांनी व्यक्तिशिल्प साकारले.एकीकडे हा चित्र-शिल्पाविष्कार सुरू असताना व्यासपीठावर नादब्रह्म ग्रुपने या महोत्सवात सुरेल वातावरणाची निर्मिती केली. उपशास्त्रीय संगीत मैफल आणि फ्युजनचे सादरीकरण करत त्यांनी रसिकांचे कान तृप्त केले.

अमोल राबाडे (बासरी), प्रसाद लोहार, अभिजित पाटील (तबला), नरेंद्र पाटील (आॅक्टोपॅड), प्रदीप जिरगे (सिंथेसायझर), गायिका उषा पोतदार, नागेश पाटील व अंध गायक सिद्धराज पाटील या कलाकारांनी मैफलीला वेगळीच उंची दिली. समन्वयक प्रशांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरासायंकाळच्या सत्रात महेश सोनुले यांच्या रसिकरंजन वाद्यवृंदने मानाचा मुजरा करवीर कलासाधकांना ही गीत मैफल सादर केली. त्यात भालजींपासून ते जगदीश खेबूडकर, आनंदघन, माधव शिंदे, सुधीर फडके, आशा भोसले, व्ही. शांताराम, अनंत माने, दिग्दर्शक यशवंत भालकर या चित्रपटसृष्टीतील मान्यवरांना त्यांच्या गाजलेल्या गाण्यांच्या सादरीकरणातून मानाचा मुजरा केला.

सुनील गुरव (सिंथेसायझर), स्वानंद जाधव (तबला), हणमंत चौगले (ढोलकी), गुरू ढोले (अ‍ॅक्टोपॅड), महेश सोनुले, वेदा सोनुले, वैदेही जाधव (गायन), निशांत गोंधळी (निवेदन) यांनी मैफल गाजवली.

कलाकृतींना वाढती मागणीकलामहोत्सवातील कलाकृतींना रसिकांकडून वाढती मागणी आहे. दिवसभरात अरुण सुतार, अनिल अहिरे, जगन्नाथ भोसले, अमेय घाटगे या कलाकारांच्या एकूण ८२ हजारांहून अधिक रकमेच्या कलाकृतींची विक्री झाली. महोत्सवाला आता अखेरचे दोन दिवस राहिल्याने कलाकृती पाहण्यासाठी सकाळपासूनच रसिकांची गर्दी होत आहे.

 

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूर