शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात साकारला संशोधनाचा ‘आविष्कार’. कलिंगडच्या बियांचा केक, महामार्गावर वीज निर्मिती; मध्यवर्ती महोत्सवाला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:56 IST

रद्दीपासून इथेनॉल निर्मिती, पाणी आणि तेल वेगळे करणारे यंत्र, महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मिती, कलिंगडच्या बियांपासूनचा प्रथिनेयुक्त असे विविध स्वरूपातील संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मध्यवर्ती आविष्कार महोत्सवात आपले संशोधन सादर केले. हे संशोधन पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आविष्कार महोत्सवात संशोधन महोत्सवात विविध संशोधन प्रकल्पराहुरी येथील कृषी विद्यापीठात दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय महोत्सवराज्यस्तरीय महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठातील ४८ स्पर्धक

कोल्हापूर : रद्दीपासून इथेनॉल निर्मिती, पाणी आणि तेल वेगळे करणारे यंत्र, महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मिती, कलिंगडच्या बियांपासूनचा प्रथिनेयुक्त असे विविध स्वरूपातील संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मध्यवर्ती आविष्कार महोत्सवात आपले संशोधन सादर केले. हे संशोधन पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती.

शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी झालेल्या मध्यवर्ती आविष्कार संशोधन महोत्सवात कऱ्हाडच्या एस. जी. एम. कॉलेजची विद्यार्थिनी रूचिता चव्हाण हिने पाणी व तेल वेगळे करणाऱ्या यंत्राचा प्रकल्प सादर केला. (छाया : नसीर अत्तार)विद्यापीठातील लोककला केंद्रात सकाळी अकरा वाजता प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ‘आविष्कार’चे उद्घाटन झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, स्कूल आॅफ नॅनो सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे समन्वयक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, महोत्सवाचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर प्रमुख उपस्थितांनी महोत्सवातील विविध संशोधन प्रकल्प पाहिले. या महोत्सवात न्यू कॉलेजमधील यश आंबोळे याने महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मितीचे संशोधन सादर केले. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या सौरभ थोरात, नयन साजणे, सुदर्शन सुतार, शिवप्रसाद शिंत्रे यांनी थ्री डी प्रिंटर डेव्हलपमेंट फॉर वॅक्स पॅटर्नचा प्रकल्प मांडला.

सायबर इन्स्टिट्यूटमधील नम्रता विभूते हिने कलिंगडच्या बियांपासून बनविलेला प्रथिनेयुक्त केक सादर केला. कऱ्हाडच्या एसजेएम कॉलेजच्या रूचिता चव्हाण हिने पाण्यामध्ये मिसळलेले तेल वेगळे करणारे यंत्राचा प्रकल्प सादर केला. त्याच कॉलेजमधील ऋतुजा थोरात हिने रद्दीपासून इथेनॉल निर्मितीचे संशोधन मांडले.

दरम्यान, या महोत्सवात मानव्यशास्त्र, वाणिज्य, मूलभूत विज्ञान, शेती व पशुसंवर्धन,अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र प्रकारातील या महोत्सवात ३६ पदव्युत्तर संशोधक, शिक्षक, विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.

राज्यस्तरीय महोत्सवासाठी ४८ स्पर्धकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव होणार आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर, शिक्षक आदी गटांतून एकूण ४८ स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठातील महोत्सवाचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी दिली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ