आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 09:10 PM2018-01-05T21:10:56+5:302018-01-05T21:15:00+5:30

समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अविष्कार’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन म्हैसेकर यांनी केले.

nashik,Avishkar,festival,muhs,university | आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार महोत्सव

आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अविष्कार’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन पदवीपूर्व (युजी)चे १९९, पदव्युत्तर (पीजी)चे १०५ विध्यार्थी


नाशिक : समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अविष्कार’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन म्हैसेकर यांनी केले.
यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागचे संचालक डॉॅ. संदीप गुंडरे, वैद्य श्रीराम सावरीकर, डॉ. तापस कुंडू, डॉ. प्रिती बजाज, डॉ. व्ही. आर. सोनांबेकर, डॉ. राहुल पाटील, डॉ. ज्योती दुबे, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. जया कुरुविल्ला, डॉ. मित्रा, डॉ. देवकर, डॉ. स्वप्नील शिवगुंडे, श्रीमती विद्या ठाकरे, डॉ. स्वप्नील तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू म्हैसेकर यांनी सांगितले की, समाजात असणाऱ्या समस्यांचा विचार करून त्याला उपयुक्त ठरणारे संशोधनाची कास विद्यार्थ्यांनी धरली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्त वाढीस लागावी, त्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या संशोधनास व्यासपीठ मिळावे तसेच केलेल्या संशोधनाला लोकमान्यता मिळावी असे विविध हेतू साध्य व्हावे यासाठी विद्यापीठाचे कुलपती यांच्या प्रेरणेने ‘अविष्कार’ संशोधन प्रकल्प आंतरविद्यापीठस्तरीय महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यावेळी प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.
विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय अविष्कार प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेत वाड्:मय, भाषा व ललितकला, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण ३२७ विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी)चे १९९, पदव्युत्तर (पीजी)चे १०५, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल., पीएच.डी) व शिक्षक (टिचर)चे २३ स्पर्धक सहभागी आहेत. अश प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. या संशोधन महोत्सवाकरीता संबंधित विषयातील परीक्षकांनी महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले. अविष्कार प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता विद्यापीठातील राजेश पाटील, श्रीमती सीमा नाटेकर, स्मिता करवल, दिनेश चव्हाण आदी  कर्मचार्यांनी  परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Web Title: nashik,Avishkar,festival,muhs,university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.