शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

कोल्हापूर : शिवाजी पुतळा, चबुतरा हलविण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन : निवास साळोखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 11:52 IST

कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे डिझाईन करताना हा पुतळा आणि त्याचा चबुतरा हलवून येथील धगधगता इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी आठवड्यात खुलासा करावा; अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा समस्त कोल्हापूरवासीय छत्रपती शिवाजी महाराज भक्तांच्या वतीने निवासराव साळोखे यांनी दिला.

ठळक मुद्देशिवाजी पुतळा, चबुतरा हलविण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन : निवास साळोखेसुशोभीकरणाबाबत आठवड्यात खुलासा करण्याचे आयुक्तांना आवाहन

कोल्हापूर : शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे डिझाईन करताना हा पुतळा आणि त्याचा चबुतरा हलवून येथील धगधगता इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी आठवड्यात खुलासा करावा; अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा समस्त कोल्हापूरवासीयछत्रपती शिवाजी महाराज भक्तांच्या वतीने निवासराव साळोखे यांनी दिला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून वर्षभर सुशोभीकरण सुरू आहे. या पुतळा आणि चबुतऱ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. आमचा सुशोभीकरणाला विरोध नाही, पण पुतळा व चबुतरा हलविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.

त्याबाबत नोव्हेंबरमध्ये संघटनांच्या वतीने आयुक्तांकडे लेखी प्रश्न उपस्थित केले; पण संबंधित अभियंता एस. के. माने यांनी उत्तरदाखल दिलेले पत्र व नकाशावरून पुतळा हलविणे, त्याच्या मूळ रूपात बदल करणार असल्याचे दिसते. त्याबाबत आयुक्तांनी आठवड्यात खुलासा करावा; अन्यथा शहराच्या चौका-चौकांत, पेठा-पेठांत जनजागृती मोहीम हाती घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा साळोखे यांनी दिला.

बैठकीतही रस्त्यावर उतरण्याचा इशारामिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीतही, निवासराव साळोखे, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, संभाजीराव जगदाळे, अशोक पोवार, बंडा साळोखे, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, आदींनी मनोगत व्यक्त करताना पुतळा व चबुतरा हलवून इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राजाराम पाटोळे, स्वप्निल पार्टे, श्रीकांत भोसले, नगरसेवक अजित ठाणेकर, मदन चोडणकर, रमेश मोरे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुतळ्याचा इतिहाससन १९२९ पासून येथे ब्रिटिश गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांचा पुतळा होता; पण स्वातंत्र्यदामिनी भागीरथीबाई तांबट, जयाबाई हविरे यांनी १९४२ मध्ये दुपारी अ‍ॅसिडमिश्रित डांबराची मडकी पुतळ्यावर भिरकावून तो पुतळा विद्रूप केला. त्यानंतर पहाटे दत्तोबा तांबट, शंकरराव माने, निवृत्ती आडुरकर, सिदलिंग हविरे, शामराव पाटील, आदींनी विल्सन पुतळ्याची तोडफोड केली. त्या जागी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी शिल्पकार बाबूराव पेंटर यांच्याकडून केवळ १८ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करून तो १४ मे १९४५ रोजी त्याच चबुतऱ्यावर दिमाखात उभा केला.

 

 

 

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर