शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कोल्हापूर : आमच्या जिवाशी खेळाल तर दारात येऊन मरू, ‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विभागीय उपनिबंधकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:16 PM

आयुष्यभर सेवा केल्यानंतर साठविलेली पुंजी मिळविण्यासाठी आम्हाला उतरत्या वयात संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. या वयात काही काही आजाराने ग्रासले आहे, उपचारासाठी पैसे नसल्याने तिघांचा मृत्यू झाला. तरीही आमच्या जिवाशी खेळाल तर याद राखा, तुमच्या दारात येऊन मरू, असा इशारा भू-विकास बॅँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार विभागाला दिला.

ठळक मुद्दे‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विभागीय उपनिबंधकांना इशाराआमच्या जिवाशी खेळाल तर याद राखा, तुमच्या दारात येऊन मरू, असा इशारा ई-निविदा पत्रकाची होळी, अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखविलेरंजन लाखे यांच्यासमवेत शिष्टमंडळाची चर्चा

कोल्हापूर : आयुष्यभर सेवा केल्यानंतर साठविलेली पुंजी मिळविण्यासाठी आम्हाला उतरत्या वयात संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. या वयात काही काही आजाराने ग्रासले आहे, उपचारासाठी पैसे नसल्याने तिघांचा मृत्यू झाला. तरीही आमच्या जिवाशी खेळाल तर याद राखा, तुमच्या दारात येऊन मरू, असा इशारा भू-विकास बॅँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार विभागाला दिला.‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची १२ कोटींची देय रक्कम बॅँकेकडे आहे. या मागणीसाठी सोमवारी कर्मचाऱ्यांनी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर ई-निविदा पत्रकाची होळी करीत अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखविले. त्यानंतर विभागीय उपनिबंधक रंजन लाखे यांच्यासमवेत शिष्टमंडळाची चर्चा झाली.

कर्मचाऱ्यांच्या देय रकमेसाठी बॅँकेची इमारती विक्री करण्याचे आदेश मंत्री समितीने दिले आहेत. त्यानुसार ई-निविदाही दोन वेळा मागण्यात आल्या; पण मालमत्ता पत्रकावर धारणाधिकार स्तंभाखाली ‘बी’ टिन्यूअर असल्याने इमारत घेण्यास कोणी तयार नसल्याचे श्रीकांत कदम यांनी निदर्शनास आणून दिले. ‘एलआयसी’ने इमारत घेण्याची तयारी दर्शविली. त्यांना ‘बी’ टिन्यूअरबाबत दिशाभूल केली. अवसायक व सहकार विभागाला ही इमारत विकायची नाही, असे दिसून येत आहे.औषधोपचारास पैसे नसल्याने शिवाजी पाटील (शिरगाव), दशरथ पाटील (कुरणी), लता पाटील (शिंपी) यांचे निधन झाले. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सत्तराव्या वर्षी हक्कासाठी आंदोलन करावे लागणे यासारखे दुर्दैव नाही. आमच्या जिवाशी खेळू नका. अन्यथा तुमच्या दारात येऊन आत्महत्या करू, असा इशारा कदम व बी. बी. कांबळे यांनी दिला.

यावर ‘बी’ टिन्यूअर काढण्यासाठी प्रयत्न करा व उपनिबंधक कार्यालयाने नवीन जागा शोधाव्यात, अशी सूचना रंजन लाखे यांनी दिली. यावेळी बॅँकेचे व्यवस्थापक एन. वाय. पाटील, रावसाहेब चौगुले, नंदकुमार पाटील, भरत पाटील, आदी उपस्थित होते.

मग करार कसला वाढविता?बॅँकेच्या इमारतीत १९८५ मध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालय आले. त्यांचा करार १९९० मध्ये संपला, तेव्हापासून विनाकरार त्यांचा कारभार सुरू आहे; पण इमारत विक्रीची निविदा निघाल्यापासून नवीन करार करण्यासाठी बॅँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. इमारत विकायची आहे, तर करार का करता? तुम्हाला तिथे ‘सहकार भवन’ उभा करायचे असल्याचा आरोप बी. बी. कांबळे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यांवर येणार आहेत. त्यावेळी आमच्या कुटुंबीयांसह त्यांना काळे झेंडे दाखविणार आहे. त्याचबरोबर २६ जानेवारीपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या दारात उपोषण सुरू करण्याचा इशारा कदम यांनी दिला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagricultureशेतीbankबँक