कोल्हापूर : आरकेनगर येथे वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:41 IST2018-05-16T13:41:23+5:302018-05-16T13:41:23+5:30
आर. के. नगर येथील सहजीवन सोसायटी रोडवर भजनाचा कार्यक्रम करुन घरी जाणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि चेन दूचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली.

कोल्हापूर : आरकेनगर येथे वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास
कोल्हापूर : आर. के. नगर येथील सहजीवन सोसायटी रोडवर भजनाचा कार्यक्रम करुन घरी जाणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि चेन दूचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली.
सोमवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी, कुसूम विठ्ठल साळवी (वय ७१ रा. द्वारका नगर, पाचगाव) ह्या सोमवारी आर. के. नगर येथील सहजीवन सोसायटीमध्ये भजनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रम आवरुन घरी चालत जात असताना पाठिमागून दूचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारुन पोबारा केला.
अचानक घडलेल्या प्रकाराने साळवी बिथरुन गेल्या. या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांनी त्यांना दिलासा देत घरी सोडले. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी मंगळवारी करवीर पोलीसांत फिर्याद दिली. चोरटे २० ते २५ वयोगटातील होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.