शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन सराफ दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:14 AM

सानेगुरुजी वसाहत परिसरात सोमवारी पहाटे चोरट्यांच्या टोळीने अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन सराफ दुकाने फोडून सात ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसानेगुरुजी वसाहत परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन सराफ दुकाने फोडलीसात ठिकाणी चोरीचा प्रयत्न : थरारक पाठलाग...चोरट्यांचे पलायन

कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरात सोमवारी पहाटे चोरट्यांच्या टोळीने अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन सराफ दुकाने फोडून सात ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला.चोरट्यांनी रोख रकमेसह विदेशी मद्याचा बॉक्स, असा सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. रात्रगस्तीच्या करवीर पोलिसांनी चोरट्यांचा थरारक पाठलाग केला; मात्र कटावणी, हातोडा टाकून ते पळून गेले. शहर व उपनगरांत वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीती पसरली आहे.सानेगुरुजी वसाहत परिसरात मेन रोडच्या बाजूला असलेली सात दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. दुकानांचे शटर उचकटून साहित्याची मोडतोड केली होती. सुशांत खाडे यांच्या केदारलिंग बेकरीचे व खताळ यांच्या राधिका ज्वेलर्सचे शटर उचकटून आत प्रवेश केला; मात्र या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

सचिन मेथे यांच्या एस. कुमार पार्लरचे शटर उचकटले कॅश कॉन्टरमधील पाच, दहा रुपयांचे क्वॉईन चोरट्यांनी पळवले. बालावधूतनगर येथील चंद्रकांत पाटील यांच्या चैतन्य सुपर मार्केट येथून काही साहित्य व ५ हजारांची रोकड लंपास केली.

विठ्ठल पार्क येथील महेश पाटील यांच्या गणेश इलेक्ट्रॉनिक्स येथील १५०० रुपयांची रोकड व चिल्लर चोरट्यांनी गायब केली. याच परिसरातील संजय चौगुले यांच्या बिअर शॉपीमधील सहा हजारांच्या रोख रकमेसह विदेशी मद्याचे बॉक्स चोरून नेला.सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चोरटे कृष्णात पाटील यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्सचे शटर उचकटत होते. यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील व हवालदार पी. एन. जाधव हे गस्ती पथकाची गाडी घेऊन तेथे आले.पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच कटावणी व इतर साहित्य तिथेच टाकून कच्च्या रस्त्याने चोरटे पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, ते पसार झाले.

सीसीटीव्हीत चोरटे कैदविठ्ठल पार्क येथील गणेश इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानमालक महेश पाटील यांनी दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावले आहेत. पहाटे चारच्या सुमारास चार चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ३० ते ३५ वयोगटातील या चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधला होता. हातात ग्लोज घातले होते. या फुटेजवरून चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर